सेन्सेक्‍सची 416 अंशांची उसळी

पीटीआय
शुक्रवार, 1 जून 2018

मुंबई - जीडीपीची चौथा तिमाहीची स्थिती, तसेच जागतिक शेअर बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर आज गुंतवणूकदारांनी बॅंकिंग, आयटी व आदी क्षेत्रांत केलेल्या जोरदार खरेदीमुळे मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४१६ अंशांनी वाढून ३५,३२२ अंशांवर स्थिरावला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत १२१ अंशांनी वाढ होऊन तो १०, ७३६ अंशांवर बंद झाला. 

आज बाजारात ५ एप्रिलनंतर प्रथमच इतकी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्‍समध्ये १८४.७० अंशांच्या वाढीसह बाजार खुला झाला. ही तेजी अखेरपर्यंत कायम राहिली. लार्ज कॅपच्या तुलनेत मिड व स्मॉल कॅप कंपन्यांच्या समभाग खरेदीवर दबाव दिसून आला. मुंबई शेअर बाजाराच्या मिडकॅप निर्देशांकात ०.२४ टक्‍क्‍यांनी, तर स्मॉल कॅप निर्देशांकात ०.५७ टक्‍क्‍यांनी घसरण झाली.

Web Title: sensex increase