सेन्सेक्‍समधील तेजीला ‘ब्रेक’

पीटीआय
बुधवार, 30 मे 2018

मुंबई - शेअर बाजारात मागील तीन सत्रांत सुरू असलेले तेजीचे वारे मंगळवारी थांबले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २१६ अंशांची घसरण होऊन ३४ हजार ९४९ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५५ अंशांची घट होऊन १० हजार ६३३ अंशांवर बंद झाला. 

जागतिक पातळीवरील चिंताजनक वातावरण, परकी गुंतवणूकदारांकडून निधी काढून घेण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे गुंतवणूकदारांमध्ये आज नकारात्मक वातावरण निर्माण झाले. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरल्याने यात आणखी भर पडली. सकाळी सेन्सेक्‍समध्ये वाढ झाली. त्यानंतर सुरू झालेल्या नफेखोरीच्या वातावरणामुळे निर्देशांकात घसरण सुरू झाली. अखेर कालच्या तुलनेत सेन्सेक्‍समध्ये २१६ अंशांची घसरण होऊन तो ३४ हजार ९४९ अंशांवर बंद झाला. मागील तीन सत्रांत निर्देशांकात ८२० अंशांची, तर निफ्टीमध्ये २५८ अंशांची  वाढ झाली होती. बॅंकिंग आणि आरोग्य सुविधा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात आज सर्वाधिक घसरण झाली.

घसरणीची कारणे 
    जागतिक पातळीवरील चिंताजनक वातावरण 
    परकी गुंतवणूकदारांनी निधी काढून घेतला 
    डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात घट  

Web Title: sensex stop share market