डॉईश बॅंक कमी करणार सात हजार कर्मचारी

रॉयटर्स
शुक्रवार, 25 मे 2018

फ्रॅंकफर्ट - डॉईश बॅंक जगभरातील कार्यालयांमधील सात हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची कपात करणार आहे. बॅंकेचे नवे प्रमुख ख्रिस्तियन सेविंग यांनी खर्चात बचत आणि नफा वाढविण्यावर भर दिला असून, याअंतर्गत हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

जर्मनीतील आघाडीची बॅंक असलेल्या डॉईश बॅंकेत जगभरात ९७ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यातील सात हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने न्यूयॉर्क आणि लंडन कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त असणार आहे. बॅंकेला सलग तीन वर्षे तोटा झाला असून, बॅंकेने युरोपातील व्यवसायावर पुन्हा लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. बॅंकेच्या समभागात वर्षभरात ३१ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक घसरण झाली आहे. 

पतमानांकन संस्थांकडूनही बॅंकेचे पतमानांकन घटविले जाण्याची भीती आहे. जागतिक गुंतवणूक बॅंक ही ओळख पुन्हा मिळविण्याच्या दिशेने बॅंकेने वाटचाल सुरू केली आहे. याचबरोबर बॅंकेने अमेरिकेतील रोखे व्यवहार, शेअर बाजार आणि हेज फंड व्यवसायात कपात केली आहे. बॅंकेतील मनुष्यबळ कपात या वर्षभरात होणार असून, यामुळे बॅंकेच्या खर्चात दहा टक्के बचत होणार आहे. काही सूत्रांच्या मते बॅंकेकडून दहा हजार कर्मचाऱ्यांची कपात केली जाऊ शकते.

Web Title: Seven thousand employees to less Deutsche Bank