रशिया-युक्रेन युद्ध ; तीन दिवसात १७ हजार कोटींची निर्गुंतवणूक

Disinvestment
Disinvestmentgoogle


मुंबई : रशिया-युक्रेन युद्ध (Russia and Ukraine war) आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FPI) देशातील गुंतवणूक काढण्यास सुरुवात केली आहे. मागील तीन भांडवली सत्रात १७,५३७ कोटी रुपयांची निर्गुंतवणूक (Seventeen thousand disinvestment) करण्यात आली. इक्विटीमधून गुंतवणूकदारांनी (investors) १४,७२१ कोटी रुपये, तर डेब्टमधून २,८०८ कोटी आणि हायब्रिडमधून ९ कोटी रुपयांची निर्गुंतवणूक झाल्याचे डिपॉझिटरी डेटामधून समोर आले आहे.

Disinvestment
नवी मुंबई : बनावट कंपन्यांच्या नावे जीएसटी फसवणूक; तिघांना अटक

गेल्या काही दिवसांत रशियाने अचानक युक्रेनवर हल्ला केल्याने जागतिक राजकारण आणि अर्थकारणातील बदल पाहता विदेशी गुंतवणूकदार भारतातून पैसे काढून मायदेशी कच्चे तेल आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. रुपया कमजोर होत असल्याने डेब्टमधून पैसे काढण्यात येत आहेत, असे जिओजित फायनाशियल सर्व्हिसेसचे व्ही. के. विजयकुमार यांनी सांगितले.

कंपन्यांच्या तिमाही निकालावर परिणाम

गेल्या काही महिन्यात भारतीय अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. तसेच विदेशी गुंतवणूकदारांनी देशातील भांडवली बाजारातून पैसे काढल्याने पुढील तिमाहीत कंपन्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

फेब्रुवारीत गुंतवणूक घटली

आशियातील उभरत्या देशांमध्ये भारतीय भांडवली बाजाराव्यतिरिक्त अन्य देशात फेब्रुवारी महिन्यात विदेशी गुंतवणूक वाढली आहे. इंडोनेशियात १,२२० दशलक्ष डॉलर्स, फिलिपिन्समध्ये (१४१), दक्षिण कोरिया (४१८) आणि थायलंडमध्ये १,९३१ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com