भूराजकीय घडामोडींमुळे शेअर बाजारात घसरण

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

मुंबई: आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या नकारात्मक घडामोडींचा परिणाम आज(शुक्रवार) भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 150 अंशांनी कोसळला आहे. दरम्यान, निफ्टीदेखील नकारात्मक व्यवहार करीत आहे.

मुंबई: आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या नकारात्मक घडामोडींचा परिणाम आज(शुक्रवार) भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स सुमारे 150 अंशांनी कोसळला आहे. दरम्यान, निफ्टीदेखील नकारात्मक व्यवहार करीत आहे.

अमेरिकेने सिरीयामध्ये हवाई हल्ले सुरु केले आहेत. सीरिया सरकारने केलेल्या रासायनिक हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने ही कारवाई केली आहे, माहिती अशी अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिली. बंडखोर आणि सरकारी फौजा यांच्या देशांतर्गत संघर्षात पिचलेल्या सीरियात नुकताच रासायनिक हल्ला झाला होता. त्यानंतर अमेरिकेने हे पाऊल उचलेले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या(10 वाजता) सेन्सेक्स 82.06 अंशांच्या घसरणीसह 29,845.28 पातळीवर व्यवहार करत आहे. दरम्यान, निफ्टी 9,235.35 पातळीवर व्यवहार करत असून 26.60 अंशांनी घसरला आहे.

भारतात संसदेत जीएसटीशी निगडित चार महत्त्वपूर्ण नियमांना मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो रेट 0.25 टक्क्यानी वाढविला आहे. शेअर बाजारात बँकिंग, ऑटो, एफएमसीजी आणि मेटल क्षेत्रात दबाव निर्माण झाला आहे. याऊलट, इतर क्षेत्रांमध्ये किंचित तेजीसह व्यवहार सुरु आहे.

निफ्टीवर आयडिया, टेक महिंद्रा, बीपीसीएल, भारती एअरटेल आणि गेलचे शेअर्स सर्वाधिक तेजीत आहेत तर सन फार्मा, अदानी पोर्ट्स, झी एन्टरटेनमेंट, बँक ऑफ बडोदा आणि पॉवरग्रिड कॉर्पोरेशनचे शेअर्स सर्वाधिक कोसळले आहेत.