शेअर बाजारात पुन्हा तेजी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 मे 2017

मुंबई : गुंतवणूकदारांनी खरेदीवर भर दिल्याने आज शेअर बाजारात तेजी परतली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 67 अंशांच्या वाढीसह 29 हजार 926.15 अंशांवर बंद झाला; तर निफ्टीतही 29 अंशांची वाढ होऊन तो 9, 314.05 अंशांवर बंद झाला. बुडीत कर्जांच्या वसुलीसाठी जादा अधिकार मिळाल्याने बॅंकांचे समभाग आघाडीवर होते. 

बाजारात तेजी परतण्यास जागतिक घडामोडीदेखील कारणीभूत ठरल्या. अमेरिकेतील रोजगारासंबंधींची आकडेवारी समाधानकार आल्याने अमेरिकी बाजारांमध्ये तेजी दिसून आली. त्याचबरोबर फ्रान्स राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत इमॅन्युअल मॅक्रोन यांची आघाडी कायम राहिल्याने जागतिक गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्याचबरोबर सिमेंट उत्पादनातील दोन बड्या कंपन्यांच्या विलीनीकरणाकडेही गुंतवणूकदार सकारात्मक पाहत असून, सिमेंट क्षेत्रातील समभागांमध्ये तेजी दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य विश्‍लेषक विनोद नायर यांनी सांगितले. 

बॅंकांबरोबरच बांधकाम क्षेत्रातील शेअर्स आणि माहिती तंत्रज्ञानातील शेअर्समध्ये खरेदीचा ओघ दिसून आला. अंबुजा आणि एसीसीच्या शेअरमध्ये अनुक्रमे 5.89 टक्के आणि 3.43 टक्के वाढ झाली. लुपिन, भारती एअरटेल, एशियन पेंट्‌स, ओएनजीसी, इन्फोसिस, सन फार्मा आदी शेअर्स वधारले. सेन्सेक्‍समधील 30 पैकी 10 शेअर्स घसरणीसह बंद झाले.