गुंतवणूकदार 25 लाख कोटींनी मालामाल! 

Share Market
Share Market

मुंबई : केंद्र सरकारच्या सुधारणांच्या धडाक्‍यामुळे संवत्सर 2073 या वर्षात तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या "सेन्सेक्‍स'मध्ये 16.61 टक्‍क्‍यांची वाढ नोंदविण्यात आली. या वर्षातील तेजीने गुंतवणूकदार तब्बल 25 लाख कोटींनी मालामाल झाले. 

शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात "सेन्सेक्‍स'मध्ये 4642.84 अंशांनी वधारला. निर्देशांकात 16.61 टक्‍क्‍यांची वाढ झाली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या "निफ्टी'त 1572.85 अंशांनी वाढ झाली असून, त्यात 18.20 टक्‍क्‍यांची वृद्धी झाली आहे. केंद्रात भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर परकी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. अनेक ब्लुचिप आणि मिडकॅप शेअर्सनी वर्षभरात गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. "सेन्सेक्‍स'ने 33,600 आणि "निफ्टी'ने 10,200 अंशांची सर्वोच्च पातळी नोंदविली. 

शेअर बाजारामधील तेजीने म्युच्युअल फंड कंपन्यांनाही आकर्षित केले. वर्षभरात म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीने विक्रमी पल्ला गाठला आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत 25 लाख कोटींची भर पडली आहे. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांबरोबर एलआयसी, ईपीएफओ आणि इतर स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारातील गुंतवणूक वाढविली आहे. परिणामी, दोन्ही निर्देशांकांची तेजीच्या वाटेवरील आगेकूच सुरूच आहे.

निरोप मात्र घसरणीने! 
"संवत्सर 2073'ची समाप्ती निराशाजनक झाली. बुधवारी "सेन्सेक्‍स' 24.81 अंशांच्या घसरणीसह 32,584.35 अंशांवर बंद झाला. "निफ्टी'मध्ये 23.60 अंशांची घसरण झाली. निफ्टी 10,210.85 अंशांवर बंद झाला. बॅंका, फार्मा, ऑटो आदी क्षेत्रातील शेअरमध्ये विक्रीचा मारा दिसून आला. बुडीत कर्जाचा भार वाढल्याने गुंतवणूकदारांनी ऍक्‍सिस बॅंकेच्या शेअरची विक्री केली. दिवसअखेर ऍक्‍सिस बॅंकेचा शेअर 9.52 टक्‍क्‍यांनी घसरला. आयसीआयसीआय बॅंक, सिप्ला, स्टेट बॅंक, लुपिन, सन फार्मा, एशियन पेंट्‌स, एचयूएल, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, मारुती सुझुकी, इन्फोसिस, एलअँडटी आदी शेअर घसरणीसह बंद झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com