विक्रीच्या मार्‍यामुळे शेअर बाजारात घसरण

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 मे 2017

मुंबई: सलग तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर शेअर बाजाराची सकारात्मक सुरूवात झाली. बाजार सुरू होताच .सेन्सेक्समध्ये 150 अंशांची वाढ झाली आणि निफ्टी 9350 पातळीच्यावर पोचला होता. मात्र बाजारात विक्रीचा मारा सुरू झाल्याने दोन्ही निर्देशांकात घसरण झाली. सेन्सेक्समध्ये 86 अंशांची घसरण झाली असून सध्या 29,832.22 पातळीवर आहे. तर निफ्टीमध्ये 19 अंशांची घसरण झाली आहे. निफ्टी 9,285.10 पातळीवर व्यवहार करतो आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात ओएनजीसी (2.97 टक्के), एचडीएफसी (+1.99 टक्के), मारुती (+1.83 टक्के), हिरो मोटोकॉर्प (+1.43 टक्के) आणि बजाज ऑटोचे (1.28 टक्के) शेअर्स सर्वाधिक वधारले आहेत. तर रिलायन्स (-1.06%), भारती एअरटेल (-1.07 टक्के), टाटा मोटर्स (0.86 टक्के), आयसीआयसीआय बँक (-0.54 टक्के) आणि सन फार्माच्या (-0.54 टक्के) शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.