चांदी ४० हजारांवर  

पीटीआय
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई - स्थानिक बाजारपेठेत मागणी कमी झाल्याने सोन्याच्या भावात गुरुवारी घसरण झाली. याच वेळी औद्योगिक क्षेत्राकडून मागणी वाढल्याने चांदीच्या भावात वाढ झाली. चांदीच्या भावात आज प्रतिकिलो ५९५ रुपयांची वाढ होऊन तो ४० हजार १६० रुपयांवर गेला. स्टॅंडर्ड सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम ३५ रुपयांची घट होऊन ३१ हजार २५५ रुपयांवर आला. शुद्ध सोन्याचा भावही प्रतिदहा ग्रॅम ३५ रुपयांची घसरण होऊन ३१ हजार ४०५ रुपयांवर आला. जागतिक पातळीवर सोन्याच्या भावात घसरण होऊन तो प्रतिऔंस १ हजार ३४६ डॉलरवर आला. चांदीच्या भावात वाढ होऊन तो प्रतिऔंस १७.२० डॉलरवर गेला.

Web Title: Silver 40 thousand

टॅग्स