'आयटी'साठी आता सिंगापूरचाही व्हिसा 'दुर्मिळ'!

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील नोकरदार, व्यावसायिकांना आता सिंगापूरमध्ये काम करण्यासाठीही व्हिसा मिळणे दुरापास्त झाले आहे. अमेरिकेच्या व्हिसा धोरणासंदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असताना सिंगापूरनेही 'आयटी' व्यावसायिकांना अगदी नगण्य संधी देण्याचे धोरण अंगीकारले आहे. 

यामुळे व्यापारी कराराचे उल्लंघन झाल्याबद्दल भारत सरकारने सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराचा (CECA) आढावा तुर्तास स्थगित केला आहे. सिंगापूरमधील भारतीय 'आयटी' कंपन्यांनी तेथील स्थानिक तरुणांनाच रोजगार द्यावा असा सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे आपला व्यवसाय इतर देशांमध्ये हलविण्याचा विचार भारतीय कंपन्या करीत आहेत. 

सिंगापूरमध्ये सर्वात आधी व्यवसाय सुरू करण्यात आघाडीवर असणाऱ्या HCL आणि TCS यांच्याशिवाय आता इन्फोसिस, विप्रो, कॉग्निझंट आणि L&T या कंपन्याही सिंगापूरला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. 

"ही व्हिसाची समस्या अनेक दिवसांपासून आहे. परंतु, 2016 च्या आरंभापासून मंजूर करण्यात येणाऱ्या व्हिसांची संख्या अगदीच नगण्य झाली आहे. सर्व भारतीय कंपन्यांना भूमिपुत्रांना रोजगार देण्याबाबतचा संदेश देण्यात आला आहे," असे 'नॅसकॉम' या सॉफ्टवेअर कंपन्यांच्या संघटनेचे अध्यक्ष आर. चंद्रशेखर यांनी एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना सांगितले. 
 
Web Title: singapore restricts visas for indian it professionals