शेअर बाजार सकारात्मक 

शेअर बाजार सकारात्मक 

मुंबई - शेअर बाजारात आजदेखील मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरू होते. मात्र, दिवसअखेर ‘सेन्सेक्‍स’ आणि ‘निफ्टी’ सकारात्मक पातळीवर बंद होण्यात यशस्वी ठरले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्‍स’ २६.५३ अंशांनी वधारून ३३,५८८.०८ पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ ६.४५ अंशांच्या किरकोळ वाढीसह १०,३४८.७५ अंशांवर स्थिरावला. 

क्षेत्रीय पातळीवर पीएसयू बॅंक, ऑटो, एफएमसीजी आणि मेटल कंपन्यांच्या शेअरमध्ये झालेल्या घसरणीमुळे निर्देशांकांनी सुरवातीची वाढ गमावली होती. बॅंक निफ्टी किरकोळ घसरणीसह २५,७३६.२५ पातळीवर व्यवहार करीत बंद झाला. निफ्टीच्या पीएसयू बॅंक निर्देशांकात ०.४ टक्‍क्‍याची घसरण नोंदविण्यात आली. आयटी, कॅपिटल गुड्‌स, कन्झ्युमर ड्युरेबल्स, ऑईल अँड गॅस आणि पॉवर कंपन्यांच्या शेअरमध्ये मात्र खरेदीचा उत्साह होता. 

मुंबई शेअर बाजारात डॉ. रेड्डीज, अदानी पोर्ट, इंडियाबुल्स हाउसिंग, बजाज ऑटो, गेल, एशियन पेंट्‌स आणि एनटीपीसीच्या शेअरमध्ये प्रत्येकी २.३ ते १ टक्‍क्‍याची घसरण नोंदविण्यात आली. भेल, इन्फोसिस, सन फार्मा, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयशर मोटर्स, टेक महिंद्रा आणि ॲक्‍सिस बॅंकेच्या शेअरमध्ये ४.६ ते ०.८ टक्‍क्‍याची वाढ झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com