सुब्रत रॉय यांना आणखी मुदतवाढ

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जून 2017

नवी दिल्ली :  सहारा समुहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांच्या पॅरोलची मूदत 5 जूलैपर्यंत वाढविण्यात आली असून, उर्वरीत 709.82 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यासाठी त्यांना आणखी 10 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

नवी दिल्ली :  सहारा समुहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांच्या पॅरोलची मूदत 5 जूलैपर्यंत वाढविण्यात आली असून, उर्वरीत 709.82 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यासाठी त्यांना आणखी 10 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपक मिश्रा, रंजन गोगई यांच्या पीठासमोर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने रॉय यांच्या पॅरोलची मूदत वाढविली. रॉय यांनी 1500 कोटी रुपये सेबीकडे जमा करण्याचे कबूल केले होते. त्यापैकी 790.18 कोटी रुपये जमा करण्यात आले असून, उर्वरीत रक्कम जमा करण्यासाठी आणखी कालावधी देण्याची मागणी रॉय यांचे वकील कपील सिब्बल यांनी केली. ती मान्य करत न्यायालयाने त्यांना 10 दिवसांचा अवधी दिला आहे.