सिंटेक्स इंडस्ट्रीजला ‘एफ अँड ओ’च्या व्यवहारातून वगळणार

वृत्तसंस्था
बुधवार, 21 जून 2017

मुंबई: राष्ट्रीय शेअर बाजाराने सिंटेक्स इंडस्ट्रीजच्या शेअरला डेरिव्हेटिव्ह अर्थात 'फ्युचर्स आणि ऑप्शन्स' व्यवहारातून (एफ अँड ओ) वगळण्याचे ठरविले आहे. बाजारात कंपनीच्या सध्याच्या करारांची मुदत संपुष्टात आल्यानंतर कोणतेही नवे करार होणार नाहीत. परंतु, जून, जुलै आणि ऑगस्टमधील करारांचे व्यवहार त्यांची  मुदत संपेपर्यंत सुरु राहतील.

सध्या(12 वाजून 31 मिनिट) सिंटेक्स इंडस्ट्रीजचा शेअर 25.40 रुपयांवर व्यवहार करत असून 0.79 टक्क्याने वधारला आहे. एक रुपया दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 17.75 रुपयांची नीचांकी तर 121.30 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या भावानुसार कंपनीचे 1,412.33 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.