दसरा, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर टाटाने आणली 'नेक्सॉन'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

टाटा मोटर्सने नेक्सॉनच्या रूपात जेन-नेक्स्ट लाइफस्टाइल कॉम्पॅक्ट एसयूव्ही सादर केली असून यात 1..2 लिटरचे पेट्रोल व 1.5 लिटरचे डिझेल इंजिन असून, सहा स्पीडचे इंजिन बसविण्यात आले आहे. एसबीएस, ईबीडीसारखी सुरक्षा फीचर स्टँडर्ड फीचर म्हणून दिली जाणार आहेत.

पुणे: दसरा, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गाडी घेण्याचा विचार करता आहात? मग टाटा मोटर्सने तुमच्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे. टाटा मोटर्सने कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीमध्ये आज (सोमवार) पुण्यात 'नेक्सॉन' ही नवीन सादर केली आहे.  

टाटा मोटर्सचे पॅसेंजर व्हेईकल बिझनेस यूनिटचे उपाध्यक्ष मोहन सावरकर यावेळी बोलताना म्हणाले की,'' टाटा मोटर्सने जेन-नेक्स्टचा विचार करून नेक्सॉन बाजारात आणली आहे. सध्याच्या वेगवान अशा नवीन पिढीची डिझाईन आणि शैलीचा यात समावेश करत चौकटीपलीकडे जाऊन नव्या दमाचे वाहन म्हणून 'नेक्सॉन'ची निर्मिती करण्यात आली आहे. टाटा मोटर्सने भविष्यात इलेक्ट्रिक वाहने आणण्याची तयारी सुरू केली आहे. भारत सरकार पेट्रोल-डिझेल वाहनांच्या विक्रीवर बंधने आणण्यासाठी पर्यायांचा शोध सुरू केला आहे. शिवाय इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराबाबत प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे आम्ही त्या बदलासाठी देखील सज्ज आहोत.''

टाटा मोटर्सने नेक्सॉनच्या रूपात जेन-नेक्स्ट लाइफस्टाइल कॉम्पॅक्ट एसयूव्ही सादर केली असून यात 1..2 लिटरचे पेट्रोल व 1.5 लिटरचे डिझेल इंजिन असून, सहा स्पीडचे इंजिन बसविण्यात आले आहे. एसबीएस, ईबीडीसारखी सुरक्षा फीचर स्टँडर्ड फीचर म्हणून दिली जाणार आहेत. तसेच, यामध्ये क्लायमेट कंट्रोल एसी, तीन ड्रायव्हिंग मोड (सेगमेंटमध्ये पहिल्यांदाच), रिअर एसी व्हेंट, हार्मन कार्डन सिस्टिम (पहिल्यांदाच) देण्यात आली आहे. टाटा नेक्सॉनच्या पेट्रोल व्हेरियंटची पुण्यातील एक्स शोरूम किंमत 5.87 लाख आहे. तर डिझेल व्हेरियंटची किंमत 6.87 लाख रुपये आहे.  

Web Title: Tata launches new car nexon

टॅग्स