टाटांच्या ‘या’ कंपनीमुळे टाटांच्या ‘त्या’ कंपनीला 10 हजार कोटींचा फायदा

वृत्तसंस्था
सोमवार, 12 जून 2017

मुंबई: आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसच्या (टीसीएस) बायबॅक ऑफरमुळे टाटा समूहातील कंपनीला मोठा फायदा झाला आहे. टाटा समूहातील भागधारक असलेल्या टाटा सन्सला टीसीएसच्या शेअर बायबॅकमधून दहा हजार तीनशे कोटी रुपये मिळाले आहे. टाटा सन्सकडे टीसीएसच्या 3.60 कोटी शेअर्सची मालकी होती. त्यापाठोपाठ सिंगापूर सरकारची 335 कोटींची, कॉपथॉल मॉरिशस इन्व्हेस्टमेंट लि. 187 कोटींची आणि युरोपॅसिफिक ग्रोथ फंडची 161 कोटींची हिस्सेदारी होती.

टाटा सन्सला जरी मोठा धनलाभ झाला असला तरी मात्र लहान भागधारकांनी बायबॅककडे पाठ फिरवली आहे. भागधारकांकडून अपेक्षेहून कमी प्रतिसाद मिळाला आहे.

टीसीएसची गेल्या महिन्यात 18 मे ते 31 मे या दरम्यान बायबॅक ऑफर सुरू होती. त्यामध्ये कंपनीकडून 16 हजार कोटी रुपयांचे 5.61 कोटी शेअर्स खरेदी केले जाणार होते. यासाठी सध्याच्या शेअर्सच्या बाजारभावापेक्षा अधिक म्हणजे 2850 रुपये प्रतिशेअर प्रमाणे टीसीएस शेअरधारकांकडून शेअर्स खरेदी करण्यात आले.