तेजस नेटवर्क्सचे शेअर बाजारात निराशाजनक आगमन

Tejas Network's disappointing arrival to the stock market
Tejas Network's disappointing arrival to the stock market

मुंबई: दूरसंचार उपकरणांची निर्मिती करणाऱ्या तेजस नेटवर्क्सच्या शेअरची बाजारात निराशाजनक नोंदणी झाली. कंपनीच्या शेअर इश्यू प्राइसच्या तुलनेत किरकोळ वाढीसह 257.70 रुपयांवर नोंदणी झाली आहे. आयपीओसाठी 257 रुपयांची इश्यू प्राइस निश्चित केली होती. मात्र शेअर बाजारात नोंदणी झाल्यापासून शेअर कंपनीने निश्चित केलेल्या किंमतीपेक्षा वरच्या पातळीवर टिकून राहण्यास यशस्वी ठरला आहे. शेअरने इंट्राडे व्यवहारात 266.15 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे.

तेजस नेटवर्क्सच्या प्रारंभिक समभाग विक्रीला 14 जून रोजी सुरुवात झाली होती. कंपनीने शेअर खरेदीसाठी कंपनीने प्रतिशेअर 250 ते 257 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला होता. प्रस्तावित योजनेत कंपनीने सुमारे 450 कोटी रुपयांच्या नव्या शेअर्सची विक्री केली आहे. 14 ते 16 जून दरम्यान खुल्या असलेल्या आयपीओला 1.88 पट अधिक प्रतिसाद मिळाला होता.

आयपीओ योजनेतून मिळालेले भांडवल विकास व संशोधन मंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन, खेळत्या भांडवलाची तरतूद आणि इतर जनरल कॉर्पोरेट कारणांसाठी वापरण्यात येणार आहे.

तेजस नेटवर्क्स ही ऑप्टिकल आणि डेटा नेटवर्किंग उत्पादनांची निर्मिती करणारी कंपनी आहे. कंपनीचा व्यवसाय सुमारे 60 देशांमध्ये विस्तारलेला असून दूरसंचार, इंटरनेट, युटिलिटी, डिफेन्स क्षेत्रातील अनेक कंपन्या तेजस नेटवर्कच्या ग्राहक आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com