एटीएम केंद्रावर मिळणार दोन हजारची नोट!

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - देशातील तब्बल 22 हजार 500 एटीएम केंद्रांवर आजपासून (गुरुवार) दोन हजार रुपयांची नोट उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.

नवी दिल्ली - देशातील तब्बल 22 हजार 500 एटीएम केंद्रांवर आजपासून (गुरुवार) दोन हजार रुपयांची नोट उपलब्ध होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली आहे.

पाचशे व हजारच्या नोटा बंद केल्यानंतर एटीएममध्ये गर्दी होत आहे. दोन हजारची नवी नोटही चलनात आली आहे. मात्र या नोटेचा आकार वेगळा असल्याने ती एटीएमद्वारे नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी एटीएममध्ये काही तांत्रिक बदल करणे आवश्‍यक होते. त्यासाठी एटीएममधील "कॅसेट ट्रे' बदलावे लागणार होते. देशभरातील काही एटीएम मशिनमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती जेटली यांनी दिली. देशभरातील सर्व एटीएम्समध्ये असे बदल करण्यासाठी बॅंकांना या 1593 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अशा प्रकारचे बदल करणे आवश्‍यक असल्याची कल्पना सरकारला यापूर्वीच होती. मात्र त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्‍यक होते. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंदीचा निर्णय गोपनीय असल्याने त्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यापूर्वीच एटीएममध्ये असे बदल करता आले नाहीत. कारण त्यामुळे हा निर्णय गोपनीय राहिला नसता असे जेटली यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. देशातील सर्व एटीएम केंद्रांची सेवा सुरळित होण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधीत असेही जेटली यांनी सांगितले होते.

अर्थविश्व

मुंबई - इन्फोसिसमधील नाट्यमय घडामोडी आणि जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी विक्रीचा पवित्रा...

09.09 AM

नवी दिल्ली - वस्तू व सेवाकर (जीएसटी) कायद्यांतर्गत ज्या व्यायसायिकांची व्यावसायिक उलाढाल २० लाखांच्या आत असूनही त्यांनी...

09.09 AM

नवी दिल्ली - मागील खरीप हंगाम आणि विद्यमान रब्बी हंगामातील पीकविम्याचे ७७०० कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले असून ९० लाख...

09.09 AM