रिलायन्स जिओला ‘ट्राय’ची कारणे दाखवा नोटीस

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार प्राधिकरणाने (ट्राय) रिलायन्स जिओने सादर केलेल्या मोफत व्हॉईस व डेटा योजनांसंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कंपनीने योजनांमध्ये केलेली मुदतवाढ हा नियमांचा भंग नसल्याचे का गृहीत धरू नये असा सवाल ट्रायने उपस्थित केला आहे. सध्याच्या नियमांनुसार जाहीरात योजना या केवळ 90 दिवसांपुरत्या मर्यदित असतात.

रिलायन्स जिओने 'वेलकम योजना' संपण्यापूर्वीच 3 डिसेंबर रोजी विद्यमान तसेच नव्या ग्राहकांसाठी "हॅप्पी न्यू इयर' योजना सादर केली होती. या योजनांची तपासणी करणाऱ्या ट्रायने या योजनेबाबत कंपनीकडून स्पष्टीकरण मागितले आहे. परंतु रिलायन्स जिओने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

कंपनीच्या ग्राहकांची संख्या 18 डिसेंबर रोजी 6.3 कोटींवर पोचली होती. डिसेंबरअखेरपर्यंत कंपनीला दूरसंचार क्षेत्रात निश्चितपणे महत्त्वाचे स्थान प्राप्त होईल, असाही उल्लेख ट्रायने आपल्या पत्रात केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

रिलायन्स जिओने ट्रायसोबत झालेल्या बैठकीत या दोन योजनांमधील फरक स्पष्ट केल्याचेही सुत्रांनी सांगितले. पहिल्या योजनेत दररोज 4 जीबी डेटा उपलब्ध करुन दिला जात. हॅप्पी न्यू इअर योजनेत मात्र ही मर्यादा केवळ 1 जीबी आहे. त्याचप्रमाणे, पहिल्या योजनेतील प्रतिदिन मर्यादा पार झाल्यानंतर रिचार्जचा पर्याय नव्हता. मात्र, दुसऱ्या योजनेत हा पर्याय उपलब्ध आहे.

अर्थविश्व

मुंबई - स्टेट बॅंक ऑफ इंडियाने बचत खात्यावरील व्याजदर कमी केल्यानंतर आता खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बॅंकेनेही बचत खात्यावरील...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मनुष्यबळ विकास मंत्रालय - आगामी काळात केवळ कामगिरीचा विचार होणार  नवी दिल्ली - कामगिरीच्या आधारे होणाऱ्या नियुक्‍...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मुंबई - ‘इन्फोसिस’ची १३ हजार कोटींचे शेअर ‘बायबॅक’ करण्याची शक्‍यता आहे. येत्या १९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017