रेल्वे केटरिंग सेवांवर 5 टक्के जीएसटी

वृत्तसंस्था
शनिवार, 7 एप्रिल 2018

सर्व रेल्वे केटरिंग सेवा आणि रेल्वे स्थानकांवर जीएसटीचा 5 टक्के एकसमान दर लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केले. 

नवी दिल्ली: सर्व रेल्वे केटरिंग सेवा आणि रेल्वे स्थानकांवर जीएसटीचा 5 टक्के एकसमान दर लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केले. 

"रेल्वे किंवा स्थानकांवर जीएसटीच्या दराबाबत कोणतीही शंका किंवा अनिश्चितता काढून टाकण्यासाठी केंद्र सरकारने गाड्या, प्लॅटफॉर्म किंवा स्टेशनमध्ये उपलब्ध केलेल्या अन्न व पेय पुरवण्यास लागू जीएसटीच्या दर एकसमान आणण्यासाठी मंजुरी दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वे किंवा भारतीय रेल्वे केटरिंग आणि टूरिझम कॉर्पोरेशनद्वारे (आयआरसीटीसी) देण्यात येणार्‍या अन्न व पेयांवर  जीएसटी दर, इन्पुट टॅक्स क्रेडिटशिवाय पाच टक्के असेल,'' असे अर्थ मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

रेल्वे मंत्रालयाला पाठविलेल्या पत्रात अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की, ''मोबाइल आणि स्टॅटिक केटरिंगसाठी विविध जीएसटी दर लागू आहेत.''

Web Title: Uniform 5% GST on all railway catering services