विजय मल्ल्यांकडून रु.900 कोटींचा गैरव्यवहार?

वृत्तसंस्था
गुरुवार, 21 जुलै 2016

मुंबई: कर्ज बुडविण्यासंदर्भात प्रकरणात अडचणीत सापडलेल्या विजय मल्ल्यांसमोर आणखी एक आव्हान निर्माण झाले आहे. सक्तवसुली संचलनालयाने युनायेट स्पिरिट्सच्या तक्रारींच्या आधारावर मल्ल्यांविरोधात 900 कोटी रुपयांच्या परकीय चलन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. 

मुंबई: कर्ज बुडविण्यासंदर्भात प्रकरणात अडचणीत सापडलेल्या विजय मल्ल्यांसमोर आणखी एक आव्हान निर्माण झाले आहे. सक्तवसुली संचलनालयाने युनायेट स्पिरिट्सच्या तक्रारींच्या आधारावर मल्ल्यांविरोधात 900 कोटी रुपयांच्या परकीय चलन गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. 

गेल्या आठवड्यात युनायटेड स्पिरिट्सने मल्ल्यांविरोधात अनेक तक्रारी दाखल केल्या. कंपनीने केलेल्या चौकशीदरम्यान 1225 कोटी रुपयांचे ‘अनियमित व्यवहार‘ झाल्याचे आढळून होते. मल्ल्यांनी स्वतःकडे युएसएलची मालकी असताना सुमारे अर्धा डझनपेक्षा जास्त परदेशी कंपन्यांमध्ये बेकायदेशीर पद्धतीने निधी वळविल्याचा कंपनीचा आरोप आहे. सक्तवसुली संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी या आरोपाला दुजोरा दिला आहे. मल्ल्यांनी निधी वळविलेल्या बहुतांश कंपन्या ‘टॅक्स हॅवन्स‘मध्ये आहेत. युएसएलने सादर केलेल्या कागदपत्रांचा तपास सुरु झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

"युएसएलच्या उपकंपन्यांमार्फत सुमारे सात कंपन्यांना हा निधी वळविण्यात आला आहे. त्यापैकी चार कंपन्या ब्रिटनमध्ये, दोन बहामाज् तर एक युरोपातील आहे. मल्ल्यांच्या कुटुंबियांच्या नावे वेगवेगळ्या ट्रस्ट्सना हा पैसा वळविण्यात आला आहे.", अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. मल्ल्यांनी पैसा वळविलेल्या परदेशी कंपन्यांमध्ये फोर्स इंडिया फॉर्म्युला वन टीम, वॅटसन, कॉन्टिनेन्टल अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, मोडाल सिक्युरिटीज्, अल्ट्रा डायनॅमिक्स आणि लोम्बार्ड वॉल कॉर्पोरेट सर्व्हिसेसचा समावेश आहे. ऑक्टोबर 2010 ते जुलै 2014 दरम्यान हा निधी वळविण्यात आला आहे.
 
मागील तीन महिन्यांमध्ये मल्ल्यांशी याविषयी चर्चा करण्यासाठी युएसएलने अनेकवेळा पुढाकार घेतला. परंतु त्यात त्यांना अपयश आले आहे. त्याशिवाय, कंपनी शेअरधारकांशी संबंधित विषयांवरदेखील चर्चा करण्यास इच्छुक आहे. परंतु आपल्यावर झालेले आरोप बिनबुडाचे असून सर्व व्यवहार युएसएलचे संचालक व शेअरधारकांच्या मंजुरीनेच झाले होते, असा मल्ल्यांचा दावा आहे. 

काही वर्षांपूर्वी मल्ल्यांनी युएसएलमधील आपला मोठा हिस्सा दिआज्जिओ कंपनीला विकला होता. तरीसुद्धा अध्यक्षपद स्वतःकडे ठेवले होते; परंतु, कंपनी मल्ल्या यांच्या मालकीची असतानाच्या काळातील आर्थिक व्यवहार व मोठ्या रकमा "किंगफिशर एअरलाइन्स‘ला दिल्यावरून "दिआज्जिओ‘ आणि मल्ल्या यांच्यात वादंग सुरू होते. "युनायटेड स्पिरिट्‌स‘ला या पूर्वीच्या व्यवहारांबाबत आर्थिक व्यवहार नियामक संस्थांकडून नोटिसा आल्या होत्या. तरीही अनेक दिवस मल्ल्या "युनायटेड स्पिरिट्‌स‘च्या अध्यक्षपदाला चिकटून राहिले होते. परंतु, "दिआज्जिओ‘ व्यवस्थापनाचा दबाव दिवसेंदिवस वाढत होता. अखेर मल्ल्या यांनी वाटाघाटी करून कंपनीचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला. याकरिता त्यांनी कंपनीकडून 515 कोटी रुपये पदरात पाडून घेतले. त्यांनी पुढील पाच वर्षे "युनायटेड स्पिरिट्‌स‘चे शेअर विकत घेणार नसल्याचे आणि संपूर्ण जगात (इंग्लंड वगळता) कंपनीशी स्पर्धा करणारा कोणताही उद्योग सुरू करणार नसल्याचे कबूल केले आहे.

आयडीबीआय बॅंकेच्या 900 कोटींच्या कर्जथकबाकी प्रकरणी मल्ल्यांसह किंगफिशर एअरलाईन्सच्या इतर अधिकाऱ्यांची ईडीकडून मनी लॉंडरिंगअंतर्गत चौकशी केली जात आहे. विजय मल्ल्यांची मालकी असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सकडे बँकांचे तब्बल 9,000 कोटी रुपयांचे कर्ज थकित आहे. 

Web Title: vijay mallya

टॅग्स