न्यायालयाच्या अवमानप्रकरणी मल्ल्या दोषी; 10 जुलैला हजर राहण्याचे आदेश

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 मे 2017

भारतातील बँकांकडून घेतलेले नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून भारताबाहेर गेलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांना न्यायालयाच्या अवमानप्रकरणी आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविले आहे.

नवी दिल्ली - भारतातील बँकांकडून घेतलेले नऊ हजार कोटींचे कर्ज बुडवून भारताबाहेर गेलेले उद्योगपती विजय मल्ल्या यांना न्यायालयाच्या अवमानप्रकरणी आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविले आहे. त्यांना 10 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मल्ल्या यांनी नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज ज्या बँकांकडून घेतले आहे त्या बॅंकांनी एकत्र येऊन मल्ल्यांविरूद्ध न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मल्ल्या यांनी एका कंपनीकडून घेतलेली चार कोटी डॉलर्सची रक्कम त्यांच्या मुलाच्या खात्यात हस्तांतरित केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणाच्या सविस्तर सुनावणीसाठी मल्ल्या यांनी 10 जुलै रोजी न्यायालयात उपस्थित रहावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.