'या' दोघांनी माझा फुटबॉल केलाय- विजय मल्ल्या

वृत्तसंस्था
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (NDA) दोन प्रतिस्पर्धी कट्टर संघ माझा फुटबॉल करीत आहेत, असा आरोप उद्योगपती विजय मल्ल्या यांनी शुक्रवारी केला. कर्जबुडव्यांना देश सोडून पलायन करण्यास प्रतिबंध करणारा कायदा सरकार आणत असल्याच्या पार्श्‍वभमीवर मल्ल्या यांनी ट्विटरवरून आरोप केले.

केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) माझ्याविरुद्ध सुरू असलेला तपास आणि ब्रिटनमधून प्रत्यार्पण करण्याचे प्रयत्न करण्यासाठी प्रसारमाध्यमांचा वापर माझ्याविरुद्ध करण्यात येत आहे, असे ट्विट मल्ल्या यांनी केले आहे. मल्ल्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की माध्यमे ही मैदान आहेत आणि मी फुटबॉल आहे. NDA आणि UPA असे दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ खेळत असून, यात दुर्दैवाने रेफरी कोणीच नाही.

केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारी कर्ज बुडवून विदेशात पलायन करणाऱ्या व्यक्तींची मालमत्ता जप्त करण्याचा कायदा आणत असल्याची घोषणा केली आहे. मागील काही काळात बड्या व्यक्ती कर्ज बुडवून विदेशात पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. कायद्याच्या कचाट्यातून पळून जाण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे यावर योग्य कायदेशीर कारवाई होईल, हे आपल्याला पाहावे लागेल, असे जेटली यांनी अर्थसंकल्प मांडताना सांगितले होते. अशा प्रकारच्या विदेशात पलायन करणाऱ्या कर्जबुडव्यांवर कारवाई करण्यासाठी कायद्यात बदल अथवा नवा कायदा आणण्यता येईल, असेही त्यांनी नमूद केले होते.

Web Title: vijay mallya says they have made me football