घाऊक महागाईत घट

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

अन्नधान्यांच्या किमतीमधील घसरणीचा परिणाम
नवी दिल्ली : अन्नधान्याच्या गेल्या काही महिन्यांमधील घसरत्या किमतींचा परिणाम म्हणून घाऊक महागाई पाच महिन्यांच्या नीचांकावर पोचली. गेल्या महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात घाऊक महागाईत 1.5 टक्‍क्‍यांची घसरण होऊन ती 2.17 टक्‍क्‍यांवर पोचली आहे. याआधी एप्रिलमध्ये घाऊक महागाई 3.85 टक्‍क्‍यांवर होती.

घाऊक किंमत निर्देशांकाच्या आधारे घाऊक महागाईचे मोजमाप केले जाते. डिसेंबर 2016 नंतर प्रथमच महागाई दर नीचांकी पातळीवर पोचला आहे. तसेच अन्नधान्याचा चलनदर ऑगस्ट 2015 नंतर प्रथमच उणे झाला आहे. प्राथमिक वस्तूंच्या दरातदेखील घट झाली आहे. तो आता 1.85 टक्‍क्‍यांवरून वाढून -1.79 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. उत्पादित वस्तूंची चलनवाढ 2.55 टक्‍क्‍यांवर पोचली आहे. भाज्यांच्या भावात सलग तिसऱ्या महिन्यात मोठी घसरण झाली आहे. भाज्यांची चलनवाढ उणे -18.51 टक्के आहे.