येस बँकेची 750 दशलक्ष डॉलरची ‘क्यूआयपी’ योजना सादर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई: खासगी क्षेत्रातील येस बँकेने पुन्हा एकदा क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट(क्यूआयपी) योजना हाती घेतली आहे. कालपासून सुरु झालेल्या या योजनेतून बँकेने सुमारे 75 कोटी दशलक्ष डॉलएवढे भांडवल उभारण्याचे ठरविले आहे. यासाठी प्रतिशेअर 1,498.95 रुपयांची फ्लोअर प्राइस निश्चित करण्यात आली आहे. कदाचित यावर 5 टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकते, असे बँकेने शेअर बाजारात सादर निवेदनात म्हटले आहे.

याआधी बँकेने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात क्यूआयपी इश्यूद्वारे तब्बल एक अब्ज डॉलरचे भांडवल उभारण्याची योजना केली होती. परंतु बँकेच्या बाजारात 'प्रचंड' अस्थिरता निर्माण झाल्यानंतर योजनेला स्थगिती देण्यात आल्याचे बँकेने सांगितले होते. मात्र, बँकेने नोंदणीसंबंधीचे बंधन आणि डिसक्लोजर नियमांचे उल्लंघन केल्याचे सेबीच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. बँकेकडून क्यूआयपीसंबंधीच्या नव्या नियमांचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आणि क्यूआयपी दाखल करण्यापुर्वी योग्य वेळेत माहिती सादर करण्यात बँकेला अपयश आले.

सध्या(10 वाजून 3 मिनिटे) मुंबई शेअर बाजारात येस बँकेचा शेअर 1532.45 रुपयांवर व्यवहार करत असून तो 16.40 रुपयांनी म्हणजेच 1.08 टक्क्यांनी वधारला आहे. दहा रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरने वर्षभरात 632.25 रुपयांची नीचांकी तर 1546.60 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे रु.64,944.55 कोटींचे बाजारभांडवल आहे.

टॅग्स