‘अपडेटेड’ नसल्याने आपली एटीएम बचावली!

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 मे 2017

मुंबई - रॅन्समवेअर व्हायरसने जगभरातील बॅंकिंग क्षेत्राला धडकी भरवली आहे. मात्र भारतीय बँका आणि एटीएम यापासून बचावली आहेत. कारण भारतात तब्बल 60 टक्के एटीएम विंडोज एक्‍सपी प्रणालीवर काम करत आहेत. ही प्रणाली कालबाह्य झाल्याने सायबर हल्ल्याला बळी पडू शकली नाहीत. असे असले तरी व्हायरसमुळे बॅंकिंग यंत्रणेत अडथळा येऊ नये, म्हणून रिझर्व्ह बॅंकेने एटीएम यंत्रणा तातडीने अद्ययावत करण्याचे आदेश बॅंकांना दिले आहेत. त्यापार्श्‍वभूमीवर देशातील बहुतांश बॅंकांनी खबरदारीचा उपाय म्हणून एटीएम सेवा बंद ठेवण्याला प्राधान्य दिले.

प्रगत देशातील बँकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे 'वॉन्नाक्राय' या रॅनसमवेअरने 150 देशांहून अधिक बँका आणि एटीएम यंत्रणेवर हल्ला केला आहे. मात्र भारतीय बॅंकिग अपडेटेड नसल्याने रॅनसमवेअरची लागण होण्यापासून बचावले आहे.

भारतात एकूण दोन लाख 25 हजार एटीएम आहेत. तब्बल 60 टक्के एटीएम विंडोज एक्‍सपी प्रणालीवर काम करत आहेत. आता एटीएम संवेदनशील असून त्या त्यापार्श्‍वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून बॅंकांनी एटीएम यंत्रणा तातडीने अद्ययावत करण्याचे आदेश रिझर्व्ह बॅंकेने दिले आहेत.

एटीएम सेवेचा संभाव्य सायबर हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी बॅंकांना एटीएम सेवा अद्यायावत करण्याच्यादृष्टीने काही बॅंकांनी एटीएममध्ये बंद ठेवल्याचे गृह विभागाने म्हटले आहे. "रॅनसम्वेअर व्हायरस"मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नजर ठेवल्याचे गृह विभागाने म्हटले आहे.

सॉफ्टवेअर निर्मात्या मायक्रोसॉफ्टनेही विंडोजवर अवलंबून असलेली एटीएम अद्ययावत करण्यासाठी विशेष सुरक्षा "पॅच' जारी केला आहे. दरम्यान, एटीएममध्ये कोणताही डेटा नसल्याने ग्राहकांची माहिती सुरक्षित असल्याचा दावा एटीएम व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांनी केला आहे.

एटीएम अतिसंवेदनशील 
एटीएमममधून दररोज हजारो कार्डांच्या माध्यमातून पैसे काढले जातात. त्यामुळे एटीएम यंत्रणा अतिसंवेदनशील आहे. सहा महिन्यांपूर्वीच सायबर हल्ल्यामुळे देशभरातील तब्बल 32 लाख डेबिट कार्ड बाधित झाली होती. सायबर हल्ल्याने सर्वच प्रमुख बॅंकांच्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यामुळे "एटीएम"सारख्या अतिसंवेदनशील यंत्रणेला सायबर हल्ल्यापासून सुरक्षित ठेवण्याचे बॅंकांसमोर आव्हान आहे.

ग्राहकांची दुहेरी कोंडी 
चलन तुटवड्याने हैराण झालेल्या ग्राहकांच्या अडचणींमध्ये सायबर हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये चलनाची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. निमशहरी भागात चलन पुरवठ्याअभावी एटीएम सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. आता रैनसमवेअर व्हायरसमुळे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यासाठी बॅंकांनी एटीएम बंद ठेवली आहेत. परिणामी ग्राहकांचे पैशांअभावी हाल होत आहेत.

अर्थविश्व

पणजी - ‘‘उद्योग धोरण लवकरच तयार केले जाईल. उद्योजकांना आपला व्यवसाय करणे सोपे व्हावे, यासाठी अशा धोरणाची गरज आहे. सध्या त्या...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई - स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांचा खरेदीचा ओघ आणि जागतिक पोषक वातावरणाने सोमवारी निफ्टीने ऐतिहासिक उच्चांक गाठला....

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पुणे - बॅंकिंग फ्रंटियर्सतर्फे सर्वोत्तम माहिती-तंत्रज्ञानप्रमुख म्हणून कॉसमॉस को-ऑप. बॅंकेच्या आरती ढोले यांना २०१६-१७ या...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017