गोष्ट 'खत्री बंधू आईसक्रीम'ची...

Khatri-Bandhu-Ice-Cream Brand
Khatri-Bandhu-Ice-Cream Brand

पुण्यातील खत्री बंधू आईसक्रीम बरंच लोकप्रिय आहे. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणत्याही ऋतुत आजारी पडण्याची कसलीही चिंता न करता पुणेकर खत्री बंधू आईसक्रीमला पसंती देतात. 'पॉट आईसक्रीम' बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या खत्री बंधूंचं 'पॉट आईसक्रीम' कसं तयार होतं हे 'ई सकाळ'च्या फेसबुक पेजवर दाखवण्यात आलं. यावेळी आईसक्रीम तयार करण्याची प्रक्रिया तर दाखवण्यात आलीच सोबत खत्री बंधूंच्या या व्यवसायाची गोष्टही त्यांनी 'सकाळ'च्या वाचकांना सांगितली. 

हा व्यवसाय कसा सुरु केला त्याबद्दल गिरीष खत्री सांगतात, 'परिस्थिती माणसाला सगंळ शिकवते. आमच्या बिजनेसची सुरवात देखील तशाच काही कारणाने. आमच्या लहानपणी एकत्र कुटूंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या वडिलांना काहितरी मदत करायची म्हणुन आठवीच्या सुट्टीत जवळच्या विठ्ठल मंदिराशेजारी भेळीचं दुकान लावायचं ठरवलं. आईशी याबद्दल बोललो तर आईने सांगितलं की भेळीच्या दुकानाऐवजी आईसक्रीम बनवायचं शिक आणि ते सुरु कर. माझ्या मामाचा आईसक्रीमचा व्यवसाय होता. त्यामुळे आईला त्याबद्दल थोडीफार माहिती होती. आईने मला मामाकडे जाऊऩ शिकण्यास सांगितले. त्याबद्दल शिकून थोडीफार जुळवाजुळव करुन हा व्यवसाय सुरु केला.' 

पहिल्या दिवशीची विक्री 9 रुपये
या व्यवसायाची सुरवात सांगताना घराशेजारी विठ्ठल मंदिराच्या बाजूला आपण सुरवात केल्याचे खत्री सांगतात. पहिल्या दिवशीची आमची विक्री 9 रुपये होती, त्यानंतर ग्राहकांच्या सुचना येत गेल्या, त्यांची दखल घेत आम्ही बदल करत गेलो आणि आमचा एक फॉर्म्युला तयार झाला जो आज लोकांना आवडला आहे असं ते आनंदाने सांगतात. 

'माउथ पब्लिसिटी'मुळे लोकं जोडली गेली
हा व्यवसाय सुरु केल्यानंतर 6-7 वर्षे तर आमच्या नावाचा बोर्ड सुद्धा आम्ही लावलेला नव्हता. 'माउथ पब्लिसिटी'मुळे लोकं जोडली गेली आणि वेगवेगळ्या ठिकाणांवरुन मागणी वाढली. पुढे त्यानूसार वेगवेगळ्या ठिकाणी आउटलेट सुरु केले. आज पुण्यात 17 ठिकाणी आम्ही विक्री करतो तसेच पुण्याच्या बाहेरही पुरवठा करतो. येत्या काळात भारताबाहेर आईस्क्रीम एक्स्पोर्ट करण्याचा विचार सुरु आहे, असेही खत्री बंधूंकडून सांगण्यात आले. 

कोणत्याही ऋतूत बिनधास्त खा
आम्ही बनवतो ते आईसक्रीम कोणत्याही ऋतुमध्ये खाऊ शकतो. त्यामुळे कोणताही त्रास होत नाही. लहान मुलांना किंवा अगदी वयोवृद्द व्यक्तींना देखील हे आईसक्रीम खायला दिले तरीही त्यांना कसलाही त्रास होत नाही. आजपर्यंत कोणतीही तक्रार इतक्या वर्षात आमच्याकडे आलेली नाही.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com