ऑनलाइन निमंत्रण

e wedding invitation
e wedding invitation
काळ बदलला लग्नाचे निमंत्रण प्रत्यक्ष देण्याऐवजी सोशल मीडियाच्या माध्यमातून देणे अंगवळणी पडले. व्हॉट्‌स ऍप आणि फेसबुकचा वापर करताना मनात आले, की जगभरात असलेल्या सुहृदांशी संपर्क करणे अगदी सहज शक्‍य झाले. मनाच्या वेगाला मागे टाकेल असा हा ई-मार्ग लग्नाच्या सोहळ्यात जवळचा ठरत आहे. स्काइपवरून तर प्रत्यक्ष निमंत्रणाचा आनंद मिळतोच. मने, कुटुंब जोडणाऱ्या या ई कार्डसविषयी...

लग्नसराईची सुरवात झाली, की पहिली गोष्ट केली जाते ती म्हणजे याद्या. नातेवाईकांपासून आप्तेष्टांपर्यंत कोणाकोणाला आमंत्रण द्यायचे हे निश्‍चित केले जाते. सध्या छापील पत्रिकांपेक्षा ई-वेडिंग कार्ड, व्हिडिओज, जीआयएफ असे वेगवेगळ्या प्रकारे आमंत्रण दिले जाते. असे निमंत्रण पाठविण्याची दोन मुख्य कारणे असतात. एक म्हणजे जर तुमचे बजेट कमी असेल किंवा निमंत्रितांची यादी खूप मोठी असते आणि सर्वांना प्रत्यक्ष जाऊन निमंत्रण पत्रिका देणे शक्‍य नसते. यासाठी पर्याय पण दोनच निमंत्रितांची यादी आणि पर्यायाने छापील पत्रिकांची संख्या या गोष्टींवर पहिली गदा येते. अशी काटछाट करण्यापेक्षा बरेच कुटुंबिय ई-वेडिंग कार्डसचा पर्याय निवडताना दिसतात.

ई-वेडिंग कार्डसचे वैशिष्ट्य
ई-वेडिंग कार्डचे वैशिष्ट्य म्हणायचे तर कमीत कमी वेळात जास्तीत मजकूर तो सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने, क्रिएटिव्हपणे आपल्या आप्तेष्टांपर्यंत पोहोचवता येतो. ई-वेडिंग कार्डस तुम्ही तुमच्या साईटवर, फेसबुक इव्हेंट, फेसबुक पेजवर, युट्युबवर अपलोड करू शकतो किंवा ई-मेलद्वारे पाठवू शकतो.

ई-वेडिंग कार्डसचा दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे वधू-वर आणि कुटुंबीयांच्या छायाचित्रांसहित, व्हिडिओ यांच्या मदतीने ही निमंत्रण पत्रिका आणखी सुंदर डिझाईन करू शकता. तुम्ही जर प्री-वेडिंग फोटो शूट किंवा फॅमिली फोटो शूट केले असेल तर ई वेडिंग कार्डससाठी त्याचा चांगला उपयोग करून घेता येतो.

ई-वेडिंग कार्डस जर तुम्हाला डिझाईन्स करून घ्यायची असतील तर नामांकित दुकानांमध्ये तसेच काही संकेतस्थळांवर ही वेडिंग कार्डस तुम्ही डिझाईन करून घेता येतात. छापील पत्रिका आणि ई-वेडिंग कार्डसचा साधारण सारखाच येतो. मात्र ई-वेडिंग ही सध्या जास्त इफेक्‍टिव्ह पत्रिका आहे. यात तुम्हाला हवी तितकी व्हरायटी तुम्ही करू शकता.

थीम वेडिंग असेल, डेस्टिनेशन वेडिंग असेल तर त्या स्थळाची थीम घेऊन किंवा वधू-वरांच्या प्रोफेशननुसार ई -कार्ड डिझाईन करता येते. या कार्डसच्या डिझाईनिंगसाठी प्रचंड क्रिएटिव्ही पणाला लागलेली असते. त्यामुळे या कार्डसची किंमत साधारण तीन हजारांपासून दहा-पंधरा हजार रुपयांपर्यंत असते. तर मग लग्नासाठी खास आणि वेगळ्या प्रकारची ई वेडिंग कार्डस नक्की करून घ्या.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com