रेल्वे राक्षस (हर्षदा परब)

eSakal Blog Mumbai Local Talk
eSakal Blog Mumbai Local Talk

10.42 ची दादरला येणारी बदलापूर ट्रेन. जशी जवळ आली तसा एक दरवाजात उभा असलेला एक मुलगा जोराची हालचाल करुन दरवाज्याच्या बाहेर येऊन दरवाजा आणि खिडीच्या मध्ये असलेल्या चिंचोळ्या भागावर चिकटला. स्पायडरमॅन चिकटावा तसा. पकडायला वर एक दोन सेमीची पन्हळ. तिही पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी केलेली म्हणजे किती पक्की याचा अंदाज लावाच. जनरली हर्बर लाईनला बऱ्याच ठिकाणी गोवंडी, मानखुर्द, डॉकयार्ड,  सेण्ट्रलला दिवा, मुंब्रा, ठाणे, सायन, माटूंग दोन्हीकडे कॉमन म्हणजे कुर्ल्याला आणि वेस्टर्न लाईनलाही अनेक ठिकाणी अशी चाळेगत दिसते. लटकणारी, किंकाळ्या फोडणारी, ट्रेन चालू झाली की चपलेचा पाय प्लॅटफॉर्मला लावून बसणारी मुलं आणि तरुण दिसतात. त्यातलाच आणि तसाच तो होता. आश्चर्य याचं वाटत होतं की त्याची त-हा निराळी होती. अगदी पूर्ण बाहेर येऊन ते ट्रेनच्या बाहेरच्या पत्र्याला अगदी निमुळत्या भागात चिकटला होता. ट्रेनही प्लॅटफॉर्मला लागली तरी वेगात होती. पण तो हसत तसाच चिकटून होता. अर्थात ते हास्य विकृत होतं. तेवढ्या सर्रकन तो निघून गेला.

 गेली तीन वर्षे दादरहून फास्ट ट्रेन पकडतेय. रात्री दहानंतर शक्यतो मी ट्रेन पकडते. पण, गेल्या काही महिन्यांपासून दादरला असे लटकणारे, किंकाळणारे, ट्रेनच्या बाहेर इतके बाहेर झुकतात की प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या बायकांना सहज हात लावतील. बायका ट्रेनमध्ये चढण्यासाठी पुढे बॅगा लावतात त्याचं हे कारण आहेच. बाकी ट्रेनमध्ये चढताना सोप्पं व्हावं हे तुलनात्मकरित्या दुसऱ्या नंबरचं कारण.

असाच एक प्रकार आठवतोय खुप वर्षांपूर्वी पाहिलेला. प्लॅटफॉर्मवरुन चालताना गाडीतला असाच एक चाळेखोर मुलगा गाडीतून झुकला माझ्या पुढून 10 ते 12 पावलांच्या अंतरावरुन चालणाऱ्या मुलीच्या मागून त्याने काही अंतर राखून असा काही हात फिरवला जणू तो त्यातून त्याने तिला स्पर्श केला. अगदी पृष्ठभागापासून ते मानेपर्यंत. इतक्या सहज आणि तिला टच न करता. ते पाहून माझ्याच मनात धस्स झालं. मला वाटलं आत्ता थोड्यावेळापूर्वी हीचा, तोच डब्बा माझ्या शेजारुन गेला. मला तर असं केलं नसेल ना याने. तेव्हा वाटलं पाठीला सॅक चिकटवतो हे बरंच आहे. तेव्हा वाटून गेलं. 'इव्ह टिजिंग'मध्ये अशा गोष्टींची दखल कशी घेणार. किंवा एखाद्या मुलीला कळलं तर तिने तक्रार काय आणि कोणाकडे करायची. मी पाहिलेल्या मुलीला तर कळलंच नव्हतं मग ती तक्रार तरी कशी करेल.   

बायका एवढ्या जवळ का उभ्या राहतात असा प्रश्न मुंबई बाहेरच्या इतरांना पडेलच. तर भरलेल्या ट्रेनमध्ये किमान तिसरी जागा मिळावी म्हणून तिच्या आधी मी ट्रेनमध्ये शिरलं पाहिजे यासाठी अगदी जवळ उभ्या असतात बायका. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागून थांबायच्या आत त्या उडी घेण्यासाठी तयार असतात. मुंबईतल्या बायकांच्या 'ट्रेनच्या सीटचं स्ट्रगल'  नक्की एखाद्या ब्लॉगमध्ये देईन. तर या बायका उभ्या असतात लटकणारे काही जण अंग चोरता मात्र काही जण तर मुद्दाम हात लांब करतात, बाहेर जरा जास्तच झुकतात मग या बायका पण थोड्या मागे येतात. कधी फक्त हात दाखवून किंवा डोक्याला आठी घालून शिव्या देण्यासारखं काही करता येत नाही.

तर मुद्दा हा की दादरसारख्या ठिकाणीही अशी चाळेगत दिसू लागलीय. त्यातल्या सीएसटीच्या दिशेने असलेल्या 12 डब्बा गाडीचा महिला डब्बा येतो तिथे समोरच पोलिस स्टेशन आहे. त्याच्या दारातच सीसीटीव्ही आहे. किती चालतो हे माहित नाही. मात्र त्यात ही चाळेगत कोणीच पाहिली नाही की पाहून दुर्लक्ष केलं जातं हे नाही माहित. 

मागे एकदा' सकाळ 'च्या मुंबई आवृत्तीने रेल्वे रावडीजवर एका न्यूज फिचर केलं होतं. दिपेश टाँक या तरुणाने या असल्या चाळेगतांचे फोटो, व्हिडिओ पोलिसांना दिले होते. त्यांच्याविरोधात कारवाई करायला यंत्रणांना भाग पाडलं होतं. त्यानंतरचं हा 'रेल्वे रावडी' शब्द रुढ झाला. पण मी माझ्या ब्लॉगमध्ये मुद्दाम रेल्वे राक्ष असं म्हटलंय. विकृत वर्तन, विकृत हसणं आणि लोकांना त्रास देणं ही राक्षसी वृत्ती. तसंच रावडीमध्ये काही नाही तर किंचितसं हिरोपण चिकटलेलं आहे. ते निघून जावं म्हणून मी इथे रेल्वे राक्षस हा शब्द जाणुनबूजून वापरला आहे.   

असल्या या रेल्वे राक्षसांबद्दल बायकांना चीड व्यक्त करणे, आपापसात शिव्या देणे एवढाच पर्याय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com