कोल्हापूर पर्यटन जिल्हा म्हणून विकसित व्हावा.. 

अनिल शिंदे
मंगळवार, 10 एप्रिल 2018

 जिल्ह्यात 'पर्यटन विकास व्हावा ' हया  हेतूने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेले "आडवाटेवरंच कोल्हापूर " ह्या उपक्रमाचे आयोजन कौतुकास्पद आहेच. परंतु याबरोबरच कोल्हापूर "पर्यटन जिल्हा " घोषित झाला तर खेडी, वाडया- वस्त्यांचा विकास होऊ शकतो.

शाहूनगरी, कलानगरी, क्रिडानगरी, चित्रनगरी ही कोल्हापूरची ओळख. महाराष्ट्राचे दक्षिणद्वार हे वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक स्थान. ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक, सांस्कृतिक आणि खाद्य परंपराचा मिलाफ येथे पाहायला मिळतो. कोल्हापूरात आले की अंबाबाई, जोतिबा, नृसिंहवाडीचे दत्तमंदीर, रंकाळा फक्त एवढीच ओळख व्हायला नको. कोल्हापूरचे खरे पर्यटन शाहुवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड ह्या डोंगराळ तालुक्यात आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेले आहे.
शिवछत्रपतींच्या शौर्याचा वारसा सांगणारे पन्हाळा, विशाळगड, गगनगड, भुदरगड, रांगणा, पारगड हे गडकिल्ले..दाजीपूर, चांदोली अभयारण्ये..राधानगरी, चांदोली, काळम्मावाडी, तिलारी धरणे त्याचबरोबर अनेक लहानमोठी बंधारे..बारा महिने दुथडी वाहणाऱ्या नद्या, असंख्य लहानमोठे धबधबे, नयनरम्य घाटमाथे, मंदिरे, सदैव हिरवा निसर्ग, सौंदर्याने नटलेल्या डोंगरदऱ्या हे सर्व हौशी पर्यटकांना साद घालताहेत. याचा विचार करून जिल्ह्यात 'पर्यटन विकास व्हावा ' हया  हेतूने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेले "आडवाटेवरंच कोल्हापूर " ह्या उपक्रमाचे आयोजन कौतुकास्पद आहेच. परंतु याबरोबरच कोल्हापूर "पर्यटन जिल्हा " घोषित झाला तर खेडी, वाडया- वस्त्यांचा विकास होऊ शकतो. तसेच ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. 'जगात भारी आम्ही कोल्हापूरी' ही ओळख करून देण्यासाठी पालकमंत्री, सर्व लोक प्रतिनिधींनी प्रयत्न करण्याची गरज आहे.

Web Title: Anil Shinde writes in Esakal Citizen Journalism