पुण्यातील वाहतूकीचा प्रश्न सोडविण्यासाठी हे उपाय करुन पाहिले तर?

राजेंद्र मुळे
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- शहरातील अधिकतर चौक हे इंग्रजी 'T' अक्षराच्या आकाराचे आहेत.त्याठिकाणी डाव्या बाजूंनी वाहतूक सुरळीत चालू ठेवून उजवीकडील रांग इतरत्र जाणाऱ्या वाहनांसाठी तात्पुरते दुभाजक लावुन नियंत्रित केल्यास वाहतुकीचा वेग वाढण्यास मदत होईल. तसेच एखादा चौक येण्यापूर्वी १०० फूटावर सुचनाफलक लावल्यास वाहनचालकाला ते सोईचे होइल. त्यामुळे बऱ्याच अंशी वाहतूक सुरळीत होइल.

अनेक चौकामध्ये डावीकडे काटकोनात वळण असते. त्याठिकाणी जर वक्राकार वळण ठेवले तर त्याचा सुध्दा फायदा वाहतूक सुरळीत राहण्यास उपयोगी ठरेल. वाहन चालकानी लेनची शिस्त पाळली तर वाहतूक पोलिसांवरील ताणही बऱ्यापैकी कमी होइल. तरी या सुचनांचा सकारात्मक विचार व्हावा.
 

टॅग्स