पैसे द्या; पावती नाही!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

पासिंग न केलेली नवीन वाहने सर्रासपणे रस्त्यावर चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमानुसार, पासिंग झाल्याशिवाय आणि नंबर दिल्याशिवाय वितरक आणि आरटीओ वाहनचालकांना वाहनाचा ताबा देऊ शकत नाही.

कात्रज : राजीव गांधी प्राणी संग्रहालयात वाहनाच्या पार्किंगची कोणतीही पावती न देता केवळ पैसे दिल्याची नोंद वहीत केली जाते. ‘अद्याप पावत्या छापून आल्या नाहीत’ असे उत्तर कर्मचारी देतात. हे अनधिकृतपणे पैसे वसूल करण्याचे काम चालू आहे का?
- एक नागरिक

parking

पासिंग न केलेली वाहने रस्त्यावर कशी?
पुणे: पासिंग न केलेली नवीन वाहने सर्रासपणे रस्त्यावर चालविण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमानुसार, पासिंग झाल्याशिवाय आणि नंबर दिल्याशिवाय वितरक आणि आरटीओ वाहनचालकांना वाहनाचा ताबा देऊ शकत नाही. पण, नियम धाब्यावर बसवून अशी वाहने चालविली जात आहेत.
- वाजिद खान

council hall

 

Web Title: citizen journalist - Give money; No receipt