फुटपाथवरून चालताना खो-खो खेळावा लागतो

गिरीष विधाते
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- वानवडी जांभूळकर चौक ते जगताप चौक पर्यंत रोज संध्याकाळी फुटपाथवरून चालणे शक्य नसते. फुटपाथ वरून चालायला जागाच नसते. त्याला एकमेव कारण म्हणजे फुटपाथ वर झालेले आक्रमण. महापालिका आणि पोलिस या बाबतीत काहीच करताना दिसत नाही. संध्याकाळी फुटपाथ वरून चालताना खो-खो मध्ये जसे आपण खेळतो तसेच काही होते. कधी फुटपाथ वरून तर कधी रस्त्यावरून चालत जावं लागतं. रस्त्यावर उतरले तर कधी शेजारच्या वाहनांचा धक्का बसेल याची गॅरंटी नाही. अनेक ठिकाणी फुटपाथ शेजारच्या दुकानातील माल बाहेरच मांडलेला असतो. एक दुकानदार तर चक्क फुटपाथवर टेबल टाकून हॉटेल चालवत आहे. 

महापालिका प्रशासन अतिक्रमण विभागातील अधिकारी याच्या कृपेने सर्व चाललेले असावे. अतिक्रमण विभाग कारवाई करताना दिसते पण तो एक फार्स असतो गाडी येते रस्त्यावरच थांबते, सर्वांना जायला वेळ देते मग कोणत्याच गाडी वर कारवाई न करता निघून जाते. पोलिसांनी तर बघ्याची भूमिका घेतली आहे असे दिसते. रस्त्यावर अनेक चारचाकी वाहने कडेला थांबलेली असतात. दोन्ही ठिकाणी चौकात प्रचंड गर्दी असूनही कोणालाही यांचे काहीही घेणे नसते. याबाबत कोणीही नगरसेवक यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत नाही.

 

टॅग्स