इंदापूरमध्ये रस्त्यांवर खड्डे

गणेश कांबळे
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

बावडा (ता. इंदापूर) : सध्या पुणे जिल्हयात जोरदार पाऊस पडल्याने ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांवरील डांबर, खडी वाहून गेल्याने रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवरील खड्यांमुळे इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रसत्यांवर अपघातात वाढ झाली आहे

रस्त्यांवरून वाहनं चालवताना दुचाकी, चारचाकी, वाहनं चालकांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागतं. तसेच अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अशा प्रकारे जीवितहानी होऊ नये, यासाठी या ठिकाणच्या आबेंडकर चौक ,व शाहू महाराज चौकांत गतीरोधक बसवावेत. तसेच इंदापूर तालुक्यातील खडडे सार्वजनिक बाधकाम विभागाच्या वतीने.तातडीने बुजवण्यांत यावे.