पुण्यात 'सहजानंद'मध्ये वारंवार वीज होते गायब 

प्रसाद सुरपूर
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

'पुण्यात भारनियमन होणार नाही' असं सगळे मंत्री सांगत आहेत.. सगळी वृत्तपत्रं बातमी छापत आहेत.. पण वर्ष झालं तरीही कोथरूडमधील सहजानंद भागात रोज वारंवार विद्युत पुरवठा विस्कळीत झालेला असतो. दर गुरुवारी भारनियमनाच्या नावाखाली वीजपुरवठा बंदच झालेला असतो. टोल नंबरवर संपर्क साधला, तर कुठल्याही अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक दिला जात नाही. आमचे फोन आणि ई-मेल आयडी ग्राहक क्रमांकाशी जोडलेला असला, तरीही कुठलीही सूचना न देता आपल्यालाच ग्राहक क्रमांक विचारत बसतात. आता ग्राहक नोंदणीकृत आहे, हे समोरच्या कॉम्प्युटरवर दिसत असतानाही वेळकाढूपणा केला जातो. लोकांचा उद्रेक होण्याची वाट पाहत आहात का?