नुकताच दुरुस्थ केलेल्या रस्त्यावर पडला खड्डा

अनिल अगावणे
गुरुवार, 14 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : सदाशिव पेठेतील शेडगे आळी येथील पेरुगेट पोलीस चौकी ते टिळक स्मारक मंदिरा पर्यंतचा हा रस्ता नुकताच दुरुस्त करण्यात आला. त्यासाठी तीन ते चार महिने या रस्त्यावरची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पण "पहिल्याच" पावसात हा रोड खचला आहे. त्यामुळे वाहनचालक किंवा पादचारी यांना नाहक प्राण गमवावे लागतील. या डांबरात कोणी हात काळे केले असतील हे स्थानिक नागरिकांना माहित आहेच, पण यामुळे एखाद्याचा जीव जाऊ नये म्हणून प्रशासनाने ताबडतोब येथे पडलेला खड्डा बुजवावा.
 

Web Title: Pits lying on a recently repaired road