सिटी प्राइडच्या चौकात रस्त्यावर साचले पाणी

अक्षय ढमाले 
मंगळवार, 10 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे ; शहरातील मुख्य पुणे-सातारा रोड येथील सिटी प्राइडच्या मुख्य चौकातील रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे रास्ता खराब होऊन रस्त्यावर खड्डे तयार झाले आहेत. पावसाचे पाणी तेथील खड्यात साचले आहे. रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांची खुप गैरसोय होत आहे. या चौकात नागरिकांना नीट सिंगलासुद्धा थांबता येत नाही. फुटपाथवरुन सुद्धा नागरिक नीट चालू शकत नाही. तरी रस्त्याचे अपूर्ण काम संबधित अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांना सांगून लवकरात लवकर पूर्ण करावे ही प्रशासनाला विनंती आहे. 
 

Web Title: rain water on the street at the City Pride Chowk