कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याआधी पोलिसांनी शहानिशा करणे गरजेचे

सचिन शांतीलाल शिंगवी
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे- विद्यार्थी संघटना आणि सार्वजनिक मंडळ यांनी आतापर्यंत देशाला व महाराष्ट्राला असंख्य नेते दिले आहेत. त्याचे सर्वोच उदाहरण मा. शरद पवार साहेब, मा. विलासराव देशमुख साहेब अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील. अशा कार्यकर्त्यांना सामाजिक परिस्थितीची जाण तळागळात काम केल्याने समजते आणि सुरू होतो जनकल्याणाचा ध्यास.

एखादा कार्यकर्ता कधीही कोठे जाऊन धडक आंदोलन करत नाही. सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासासाठी स्थानिक पातळीवर पत्रव्यवहार करतो व प्रशासनाला विनंती करतो. जर दाद नाही मिळाली तर प्रशासनाच्या अतिवरीष्ठ अधिकाऱ्यांशी लेखी पत्रव्यवहार करतो आणी त्याच्याशी पत्र व्यवहार करून दाद मागण्याचा प्रयत्न करतो.  हे सगळे कशासाठी ? तर सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी. पण जर हे सगळे सोपस्कार करून प्रश्न सुटत नसतील तर आंदोलनाचे हत्यार उपसून रस्त्यावर उतरतो.

नुकतेच फेरीवाल्यांचे आंदोलन वाचनात आले आणि सिंहगड रोड वरील आंदोलनात कार्यकर्त्यांवर कलाम 395 प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्याचे वाचले. वाचणाऱ्या प्रत्येकाला हे माहीत आहे की कोणत्याही संघटनेचा, पक्षाचा, विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता आंदोलनातून असले काम करणार नाही. यामागे राजकीय हस्तक्षेप असू शकतो. जर अश्या प्रकारे कार्यकर्त्यांवर शहानिशा न करता गुन्हे दाखल होणार असतील तर ह्यापुढे संघटनेत कोणत्याही पक्षाला ,संघटनेला कार्यकर्ते मिळणार नाहीत आणि सर्वसामान्य जनता उदयाला येणाऱ्या नेतृत्वाला मुकेल.