दुचाकीस्वार सावधान !

संजय पाटील
रविवार, 27 मे 2018

कोरेगावपार्क : येथील लेन नं. ४ मधून पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर (४अ) दोन्ही बाजूला वाळूचे ढिग ठेवले असून ती वाळू रस्त्यावर घसरून आल्यामुळे दुचाकी गाड्या घसरून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात या रस्त्यावर बंगला क्र. ११७ मध्ये नुतनीकरण काम चालू आहे त्या कामातून निघालेली वाळू बंगल्याच्या आवारात मुबलक जागा उपलब्ध असून सुद्धा समोरच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला बेजबाबदारपणे टाकलेली आहे.

कोरेगावपार्क : येथील लेन नं. ४ मधून पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर (४अ) दोन्ही बाजूला वाळूचे ढिग ठेवले असून ती वाळू रस्त्यावर घसरून आल्यामुळे दुचाकी गाड्या घसरून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात या रस्त्यावर बंगला क्र. ११७ मध्ये नुतनीकरण काम चालू आहे त्या कामातून निघालेली वाळू बंगल्याच्या आवारात मुबलक जागा उपलब्ध असून सुद्धा समोरच्या रस्त्यावर दोन्ही बाजूला बेजबाबदारपणे टाकलेली आहे. ह्या रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी लहान मुले तसेच सर्व वयोगटातील लोक चालण्यासाठी व सायकलिंग करण्यासाठी येतात, दुचाकींची वरदळ सुद्धा असते त्यामुळे कोणतीही अघटित दुर्घटना होण्यापूर्वी संबंधित विभागाने पाहणी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी तसेच बेजबाबदारपणे वर्तुणूक करून इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

Web Title: Two-wheeler riders careful!