भारताचा पहिला डाव 316 धावांत संपुष्टात

वृत्तसंस्था
शनिवार, 1 ऑक्टोबर 2016

कोलकाता : न्युझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव 77 धावांची भर घालून संपुष्टात आला. एकवेळ तीन बाद 46 अशी अवस्था झाली असतानाही चेतेश्‍वर पुजारा आणि अजिंक्‍य रहाणे यांच्या संथ पण भक्कम फलंदाजीमुळे भारताला सन्मानजनक धावसंख्या उभारण्यात यश मिळाले.

न्यूझीलंड विरुद्ध भारत या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दोन्ही संघांचे पारडे जवळपास समान राहिल्याचे चित्र होते. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला, तेव्हा भारताने सात गडी गमावून 239 धावा केल्या होत्या. वृद्धिमान साहा 85 चेंडूत 54 धावा करून नाबाद राहिला. तर रविंद्र जडेजा 31 चेंडूत 14 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर भुवनेश्‍वर कुमार (11 चेंडूत 5 धावा) आणि मोहंमद शामी (14 चेंडूत 14 धावा) करून बाद झाले. त्यामुळे भारताच्या धावसंख्येत आज (शनिवार) 77 धावांची भर पडली आणि भारताला 316 धावांवर समाधान मानावे लागले.

पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. दुखापतींनी घेरलेल्या न्यूझीलंडच्या संघाला आज (शुक्रवार) सामन्यापूर्वी कर्णधार केन विल्यमसनच्या आजारपणाचाही फटका बसला. ताप आल्यामुळे विल्यमसन या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत रॉस टेलरकडे कर्णधारपद सोपविण्यात आले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी चांगली सुरवात केली. चाचपडणारा शिखर धवन दुसऱ्याच षटकात बाद झाला. त्यानंतर मुरली विजयही फार काही करू शकला नाही. भरवशाचा विराट कोहलीही केवळ नऊ धावा करून बाद झाला. यामुळे एकवेळ भारताची अवस्था तीन बाद 46 अशी झाली होती. मात्र नंतर चेतेश्‍वर पुजारा (219 चेंडूत 87 धावा) आणि अजिंक्‍य रहाणेने (157 चेंडूत 77 धावा) डावाला सावरण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

Web Title: India vs newzeland test cricket second day