विराट गॉगल लावूनही धावा करील- कपिलदेव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

मुंबई : विराट कोहलीच्या तंत्रावर शंका उपस्थित करणाऱ्या जेम्स अँडरसनच्या वक्तव्याचा भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांनीही समाचार घेतला. विराट जगात कोठेही धावा करील. इतकेच नव्हे; तर गॉगल लावूनही फलंदाजी केली तरी तो धावांचा पाऊस पाडेल, असा टोला कपिलदेव यांनी अँडरसनला लगावला.

दोन वर्षांपूर्वी ज्या इंग्लंडमध्ये विराट कोहली अपयशी ठरला होता, त्याच इंग्लंडमध्ये तो आता धावा करू शकतो. सध्या तो इतक्‍या कमालीच्या फॉर्मध्ये आहे की गॉगल लावून फलंदाजी करायची ठरवले तरीही तो धावांचा पाऊस पाडू शकतो, असे कपिलदेव यांनी म्हटले आहे.

भारताच्या या स्टार फलंदाजाने आत्तापर्यंत तिन्ही प्रकारांच्या खेळात 41 शतके केली आहेत आणि या तिन्ही प्रकारांत 50पेक्षा अधिक सरासरी असलेला तो एकमेव फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडण्याची क्षमता विराटमध्ये आहे आणि ज्यो रूट व स्टीव स्मिथ या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा तो सरस आहे. सध्याचे विक्रम पाहिले तर तो किती श्रेष्ठ आहे हे स्पष्ट होते, असे कपिलदेव म्हणाले.

फलंदाजीत विराट सर्वांपेक्षा पुढे असला आणि त्याच्या नेतृत्वपदी भारत कमालीचे यश मिळवत असला, तरी त्याच्या कर्णधारपदाची तुलना आत्ताच करणे योग्य ठरणार नाही. सलग पाच कसोटी मालिका जिंकून कोहली निश्‍चितच कर्णधारपदी प्रभावशाली कामगिरी करत आहे, असे कपिलदेव यांनी सांगितले.
कपिलदेव यांनी विराटबरोबर आर. अश्‍विनचेही कौतुक केले. अश्‍विन माझे किंवा इतरांचे किती विक्रम मोडतो यापेक्षा तो इतरांसाठी किती मैलाचे दडग उभे करतो, हे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.