वार्षिक राशिभविष्य | सिंह - कुबेराची कृपा अन् ऐश्वर्य वृद्धी

Yearly Horoscope
Yearly Horoscopesakal

करारी व धाडसी बुद्धिमत्ता असल्याने जिथे जातील, तिथे छाप पाडतील. जमीन, घर, वाहन, भरपूर संपत्ती या दृष्टीने हे लोक भाग्यवान असतात. कोर्ट प्रकरणात मात्र त्यांनी चुकूनही पडू नये. सिंह राशीच्या लोकांना आयुष्यात कधीतरी एकदा मोठ्या अपघाताला अथवा दुर्घटनेला सामोरे जावे लागते. एखाद्याची रास कोणतीही असो, पण, या राशीचा स्वामी रवी जर बलवान असेल, तर इतर ग्रहांचे परिणाम निश्‍चितच जाणवतात.

ज्यावेळी जगण्याचा एक मार्ग बंद होतो, त्यावेळी दुसरीकडे कुठेतरी नशिबाचा दुसरा दरवाजा उघडलेला असतो. मात्र, आपले प्रयत्न अखंड सुरू राहावेत, हे शिकवणारी रास म्हणजे सिंह. राशिचक्रातील पाचवी रास. एखादी संस्था अथवा कुटुंब किंवा राष्ट्र यांचा मुख्य कणा म्हणजे ही रास मानता येईल. वर्चस्व गाजविण्याची इच्छा, जे काही करतील त्यांना हुकूमत हवी. पूर्व दिशेवर या राशीचा अंमल आहे. घनदाट जंगले, पर्वत व गुहा तसेच एक या संख्येवर मालकी असल्याने या राशीच्या लोकांनी गाडी, घर वगैरे घेताना एक अंकी बेरीज करून एकशी संबंधित घेतल्यास त्यांना ते उत्तम लाभते. स्पष्टवक्ता स्वभाव, राग आल्यास रुद्रावतार, पण तितकाच समजूतदारपणाही त्यांच्याकडे असतो. सामाजिक व राजकीय कार्यात पुढाकार घेण्याची आवड. पितृदोष याच राशीतील एका नक्षत्रामुळे समजतो. स्नायूरोग, त्वचारोग, हृदयरोग याच राशीत दिसून येतात. नेहमी पुढे जाण्याची आवड, कर्तव्यदक्ष, भांडणात कायम पुढे असणारे, दानधर्म करणारे, कष्टाला पर्याय नाही असे म्हणणारे, अशा विविध रंगाच्या व्यक्ती या राशीखाली आढळतात. लहानपणी यांची परिस्थिती कशीही असली, तरी मोठेपणी मात्र अत्यंत श्रीमंत होतात. समाजात मानसन्मान, शत्रूवर विजय, प्रेतबाधा, सर्पबाधा, अग्निपिडा, ज्वरपिडा यांचाही प्रभाव या राशीवर पडतो.

करारी व धाडसी बुद्धिमत्ता असल्याने जिथे जातील, तिथे छाप पाडतील. जमीन, घर, वाहन, भरपूर संपत्ती या दृष्टीने हे लोक भाग्यवान असतात. कोर्ट प्रकरणात मात्र त्यांनी चुकूनही पडू नये. सिंह राशीच्या लोकांना आयुष्यात कधीतरी एकदा मोठ्या अपघाताला अथवा दुर्घटनेला सामोरे जावे लागते. एखाद्याची रास कोणतीही असो, पण या राशीचा स्वामी रवी जर बलवान असेल, तर इतर ग्रहांचे परिणाम निश्चितच जाणवतात. यावर्षी शनि संपूर्ण वर्षभर षष्ठस्थानी राहणार आहे. हा शनि काही बाबतीत अतिशय चांगली, तर काही बाबतीत एकदम विरुद्ध फळे देईल. आरोग्याच्या तक्रारी, आर्थिक परिस्थितीवर परिणाम, कायदेशीर बाबींमुळे अपकीर्ती, शिक्षणात अडथळे तसेच वैवाहिक जीवनात अडचणी उद्‌भवतील. नोकर-चाकर व हाताखालची माणसे फसवतील. वकील तसेच कायदेकानूनशी संबंध असलेल्यांना चांगले फळ देईल. यंत्रसामग्री, मशिनरी, कारखानदारी यांच्याशी संबंध असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. मोठी भावंडे, काका, मामा यांच्या बाबतीत जपावे लागेल.

यावर्षी मार्चपर्यंत राहू दशमात राहणार आहे. हा राहू राजयोगासारखे फळ देईल. मातीही सोन्याच्या भावाने विकली जाईल. कोणत्याही क्षेत्रात राहा, प्रचंड लाभ होईल. मोठा धनलाभ, चांगल्या-वाईटाची पारख उत्तमरीतीने होईल. संततीचे सुख मनाप्रमाणे मिळेल. या राहूच्या कालखंडात भावंडांशी चांगले संबंध ठेवा, निश्चितच भाग्योदय होईल. जर तुमचा फिरत्या व्यवसायाशी संबंध असेल तर गडगंज संपत्ती मिळवाल. नोकरी-व्यवसाय असेल तर अधिकार पद मिळेल. तुमच्या बुद्धिमत्तेला योग्य ठिकाणी वाव मिळेल. अपेक्षेपेक्षा अधिक उत्कर्ष होणे, हा या राहूचा गुणधर्म आहे. त्यामुळे नाना प्रकारची सुखप्राप्ती होईल, पण त्याचबरोबर वडीलधारी व्यक्ती व सरकारशी मतभेद होतील. त्यांच्याकडून त्रास संभवतो. वाहनामुळे त्रास. राजकारणात असाल तर मोठे यश मिळेल.

केतू चतुर्थात भ्रमण करीत आहे, त्यामुळे पैशांची वारेमाप उधळपट्टी होईल. त्यासाठी आतापासूनच खर्चावर नियंत्रण ठेवावे. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. त्यानंतर राहू भाग्यात येईल आणि जीवनाला काहीतरी कलाटणी देऊन जाईल. प्लूटोचे वास्तव्य शनिसोबत आहे, त्यामुळे हाताखालील माणसांवर योग्य देखरेख ठेवा. एखाद्या संस्थेचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. मोठ्या कामाची उत्कृष्ट अंमलबजावणी करू शकाल. एप्रिलपर्यंत गुरुचे भ्रमण सप्तमात होत आहे. गुरु सर्व बाबतीत शुभ फळ देणार आहे. भागीदारी व्यवसाय, दूरचे प्रवास, कोर्ट मॅटर, थोरामोठ्यांचा सहवास यादृष्टीने उत्तम अनुभव येतील. त्यानंतर गुरु अष्टमात जाईल. अचानक धनलाभ, जागेचे व्यवहार पूर्ण होणे, वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी, विवाहापासून फायदा, वारसाहक्काने इस्टेट मिळणे, जिवावरच्या संकटातून वाचणे, असे शुभ अनुभव येतील. गुरुच्या या कालखंडात सोने धारण केल्यास भाग्य वाढेल. कुबेराची कृपा, ऐश्वर्य वृद्धी, असे अनुभव येतील. यावर्षीचे ग्रहमान दर महिन्यात वेगवेगळे फळ देईल.

मासिक फलाफल

  • जानेवारी - मघा व पूर्वा नक्षत्र व्यक्तींना सर्व सुख उपभोगायला मिळतील. सर्व इच्छा पूर्ण होतील. उत्तरा नक्षत्र प्रथम चरण व्यक्तींना काही समस्यांना सामोरे जावे लागेल. शक्यतो नोकरी-व्यवसायात जपून राहणे आवश्यक आहे, असे संक्रांती फळ दर्शवित आहे. त्याचा परिणाम वर्षभर राहील.

  • फेब्रुवारी - पाच महत्त्वाचे ग्रह नको त्या ठिकाणी आहेत. अपघात, गंडांतर, भिन्नलिंगी व्यक्तीकडून नुकसान, नको त्या प्रकरणात अडकणे, असे अनुभव येतील. मात्र, त्यातूनच पुढील जीवनाचा पाया घातला जाईल. या कालखंडात कोणाच्याही नसत्या उठाठेवी करू नका. निष्कारण अडकून बसाल.

  • मार्च - राहू भाग्यात येत आहे. सरकारी नोकरी असेल तर त्यात बदल संभवतात. नातेवाईकांच्या मुलांसाठी खर्च करावा लागेल. बहीण-भावंडात किरकोळ कारणावरून मतभेद होऊ शकतात. रामरक्षा वाचन सुरू ठेवावे म्हणजे या राहू-केतूचा वर्षभर काहीही त्रास होणार नाही. तरुण वर्गाने वाहन जपून चालवावे, तसेच नको ती धाडसी कृत्ये करू नयेत.

  • एप्रिल - गुरु-शुक्र युती मोठ्या प्रमाणात पैसे मिळवून देईल. जर मूळ पत्रिकेत गुप्त धन मिळण्याचे योग असतील, तर या कालखंडात त्याचा फायदा होईल. मंगळ-शनि युती वैवाहिक जोडीदारांच्या बाबतीत काळजी घेण्यास सुचवित आहे. अतिदूरचे प्रवास टाळावेत.

  • मे - आर्थिक कारणावरून काहीजण तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील. सावध राहणे आवश्यक. शुक्र-राहूचे भ्रमण अत्यंत विचित्र अनुभव देईल. त्यातून जीवनात कसे वागावे, याचा अंदाज लागेल. आपले कोण व परके कोण, हे समजेल. कुठेही खरेदी-विक्री करताना लोकांसमोर पैसे बाहेर काढू नका.

  • जून - बुध-शुक्र युती आणि गुरु-नेपच्यून योग, शिवाय बलवान मंगळ हा एक प्रकारचा भाग्योदयकारक योग म्हणता येईल. विशेष प्रयत्न न करता सर्व कामे होतील. आर्थिक स्थिती भक्कम राहील.

  • जुलै - रवि-शनिचा प्रतियोग गुप्तशत्रूंचा त्रास निर्माण करील. त्यांच्या कारवाया जाणवतील. राहू-मंगळ योग बाधित दोष निर्माण करेल. वास्तू वगैरे खरेदी करताना त्याचा बाधितपणा व पूर्वेतिहास तपासा. काही कारणाने कुटुंबातील एखादी व्यक्ती दूर जाण्याची शक्यता.

  • ऑगस्ट - राशीस्वामी बलवान आहे. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नोकरी-व्यवसायात दगदग वाढली, तरी त्या प्रमाणात पैसाही भरपूर मिळेल. बुधाचे भ्रमण सर्व बाबतीत शुभ आहे. कागदोपत्री व्यवहार पूर्ण करून घ्या. शनि-शुक्र योगावर वैवाहिक जीवनात महत्त्वाच्या घटना घडतील.

  • सप्टेंबर - रवि, बुध, शुक्र राशीगुरुचे होणारे प्रयोग तुम्हाला सर्व कार्यांत मोठे यश देणार आहे. भगीरथ प्रयत्न करूनही न होणारी कामे या महिन्यात होतील. आर्थिक आणि व्यावसायिक बाबतीत शनिचे पाठबळ मिळणार आहे.

  • ऑक्टोबर - संघर्षातून मोठे यश देणारे ग्रहमान. कष्ट तुमचे, पण फायदा दुसऱ्याला असे अनुभव येतील. सामाजिक व राजकीय क्षेत्रात असाल तर सर्व प्रकारच्या धोक्यापासून सांभाळावे लागेल.

  • नोव्हेंबर - अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या कार्यात मंगळाचे उत्तम सहकार्य मिळेल. मुलाबाळांच्या बाबतीत शुभ घटना. रवि, बुध, केतूचा योग चांगला नाही. कौटुंबिक वातावरण गढूळ राहील. गैरसमज व वादावादीला प्रोत्साहन देऊ नका. तसेच, अनोळखी लोकांना शक्यतो घरात घेणे टाळा.

  • डिसेंबर - कागदोपत्री व्यवहार जपून करावे लागतील. रवि-शुक्राचे भ्रमण वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण ठेवेल. मंगळ-राहू योग काहीतरी मोठे धाडस करण्यास भाग पाडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com