वार्षिक राशिभविष्य | कन्या - पूर्वार्धात संघर्ष; उत्तरार्धात भाग्योदय

Yearly Horoscope
Yearly Horoscopesakal

अत्यंत हुशार, कोणतेही काम मन लावून करणे, वागण्या-बोलण्यात बुद्धीची चमक, एखाद्याची स्तुती करून त्यांच्याकडून काम करून घेणे या गोष्टी या राशीला उत्तम जमतात. आत्मकेंद्रित असल्याने त्यांना राग लवकर येतो. त्यामुळे रागाच्या भरात काहीतरी पटकन बोलून जातात व माणसे तुटतात. सर्व काही चांगले असूनही केवळ बोलण्यातून गैरसमज निर्माण होऊन यांच्यापासून लोक दुरावले जातात. वयाच्या ३२ पर्यंत यांच्या जीवनात फारशा महत्त्वाच्या घडामोडी घडत नाहीत, पण त्यानंतर प्रगती सुरू होते.

जगाला सुधारणे आपल्या हातात नाही, पण आपण स्वतः सुधारल्यास जग आपोआप सुधारेल, हे शिकवणारी रास म्हणजे कन्या. बुद्धिमत्ता, चातुर्य, जीवनमान यांचा योग्य समन्वय साधून जीवनात यशस्वी कसे व्हावे, हे शिकवणारी ही रास. निसर्गचक्रातील ही सहावी रास. पोट व अातडी यावर या राशीचा विशेष अंमल असतो. शिस्तप्रिय, योग्य अंमलबजावणी, धूर्त राजकारण, एकाच वेळी दोन्हीकडून विचार करण्याची शक्ती, आकर्षकपणा, नाजूकपणा आदी गोष्टी या राशीत दिसून येतात. मनात आणले तर सर्व काही करून दाखवतील. या लोकांच्या मनात काय खलबते सुरू असतात, याचा थांगपत्ता कधीही लागत नाही.

उत्तरा, हस्त, चित्रा या तीन नक्षत्रांच्या समूहाने कन्या रास तयार झालेली आहे. कठोरपणा, चिडखोरपणा, काही वेळा कोणाचेही न ऐकणारे असे लोक या राशीत आढळतात. कुशल कार्यकर्ते, अभियंता, पेंटर, राजदूत, राजकारणी, कामगारवर्ग, वकील, साहित्यिक, आचारी-स्वयंपाकी या क्षेत्रात या व्यक्ती आढळतात. हास्यविनोद, सर्वगुणसंपन्न तसेच शत्रूंचा बीमोड करणे, आकस्मिक धनप्राप्ती, परंपरांना मानणाऱ्या अशी त्यांची ओळख असते. प्रशंसात्मक महत्त्वाची कार्ये होतात.

अग्निबाण, नेत्रपेढी, विषारी जंतू किंवा प्राण्यापासून धोका, झाडावरून पडणे, शस्त्रक्रिया तसेच जंगलात किंवा दऱ्याखोऱ्यात गंभीर अपघात हे या राशीचे वैशिष्ट्य असू शकते. साधा व सरळ स्वभाव, स्वाभिमानी वृत्ती आणि उदार स्वभाव यामुळे काही वेळा व्यक्ती फार मोठ्या संकटात पडलेले दिसून येतात. मित्रमंडळी यांना मोठ्या प्रमाणात फसवतात. अकौंटंट, कायदेशीर सल्लागार, राजकारणी, पुस्तक प्रकाशन, आयुर्वेद व डॉक्टर, लॉजिंग-बोर्डिंग व्यवसाय, वकिली, प्राप्तिकर आणि विक्रीकर सल्लागार यातही यांचे प्राबल्य दिसून येते. अत्यंत हुशार, कोणतेही काम मन लावून करणे, वागण्या-बोलण्यात बुद्धीची चमक, एखाद्याची स्तुती करून त्यांच्याकडून काम करून घेणे, या राशीला या गोष्टी उत्तम जमतात.

आत्मकेंद्रित असल्याने त्यांना राग लवकर येतो. त्यामुळे रागाच्या भरात काहीतरी पटकन बोलून जातात व माणसे तुटतात. सर्व काही चांगले असूनही केवळ बोलण्यातून गैरसमज निर्माण होऊन यांच्यापासून लोक दुरावले जातात. वयाच्या ३२ पर्यंत यांच्या जीवनात फारशा महत्त्वाच्या घडामोडी घडत नाहीत, पण त्यानंतर प्रगती सुरू होते. बुद्धिमत्ता असली, तरी कुणीतरी त्यांना पाठिंबा देणे आवश्यक आहे, तरच ते वर येऊ शकतात. कोणत्याही गोष्टीची निगेटिव्ह बाजू ते प्रथम पाहतात व तेच डोक्यात घेऊन बसतात. त्यामुळे यांना साध्यासुध्या कारणानेही फार लवकर नैराश्य येते. या राशीच्या लोकांना काही विशिष्ट तंत्राने हाताळल्यास ते तुमच्यासाठी काहीही

करू शकतात.

यावर्षी गुरु एप्रिलपर्यंत सहावा राहणार असून, आरोग्य, नोकरी, व्यवसाय व धनलाभ या बाबतीत जरा त्रासदायक फळे देईल. मात्र, विश्वासू नोकर मिळतील. त्यानंतर तो सप्तमस्थानी येत आहे. लग्नासाठी चांगला जीवनसाथी मिळेल. भागीदारी व्यवसाय करण्यास अनुकूल काळ. कोर्ट प्रकरणे असतील तर यशस्वी होतील. वर्षभर शनि महाराज पंचमात राहणार आहेत.

घर, जमीन, खाणी, स्थावर व्यवसायात फायदा होईल. शिक्षण, संततीसौख्य, प्रेम प्रकरणे व आर्थिक बाबतीत काही अडचणी निर्माण होतील. काहीतरी नवीन शास्त्रीय शोध लावल्याने नावलौकिक होईल. या शनिबरोबर ज्यावेळी रवी आणि मंगळ ग्रह युती करतील, त्यावेळी अपघात, आजार, गंडांतर येण्याची शक्यता आहे. यावर्षी राहू मार्चपर्यंत भाग्यस्थानी राहणार असून, केतू तृतीयात राहील. प्रगतीसाठी नवीन युक्ती लढवावी लागेल. काही वेळा एखादी नसलेली गोष्ट खरी करून दाखविण्याचा प्रयत्न कराल. परदेश प्रवासाची संधी मिळेल. यावर्षी विवाहाचे उत्तम योग आहेत. नोकरीत असाल तर भाग्योदय होईल. त्यानंतर राहू अष्टमस्थानी येईल. विषारी जनावरांपासून दूर राहा. इतर मार्गाने धनप्राप्तीचे योग आहेत. वाहन जपून चालवा. अपघात व संकटे निर्माण करणे, हा येथील राहूचा गुणधर्म आहे.

यंदाही हर्षल अष्टमात राहणार आहे. वैवाहिक जोडीदाराकडून काहीतरी फायदा होईल. पण, अचानक काही प्रकरणे निर्माण होऊन कोर्टात अडकण्याची शक्यता आहे. वारसा हक्काची प्रकरणे सुरू असतील तर काळजी घ्यावी. महत्त्वाची कागदपत्रे इतरांच्या हाती पडणार नाहीत, याची काळजी घ्या.

मासिक फलाफल

जानेवारी - यावर्षीची संक्रांत फारशी आशादायक नाही, त्यामुळे तुम्ही सर्व बाबतीत जपून राहावे. कोणतेही व्यवहार जागरूक राहून करावेत. तुमच्या राशीतील कोणत्या नक्षत्राचे फळ कसे असेल, ते पंचांगात पाहावे.

फेब्रुवारी - असलेली नोकरी अथवा व्यवसाय सोडण्याचा विचार करू नका. काही भाग्यवंतांसाठी जागेचे योग. जर प्रेम प्रकरणात असाल तर यशस्वी व्हाल. कला, साहित्य, संस्कृती, चित्रपट क्षेत्र, नाट्यसंगीत यांच्याशी संबंध येईल. पण, रियालिटी शो वगैरे असेल तर काही गोष्टी मनाविरुद्ध घडतील.

मार्च - मंगळ, शुक्र, शनि योग काही प्रकरणावरून कुटुंबात वादंग निर्माण करील. तरुण वर्गाने सावध राहणे आवश्यक. काही जणांना प्रवासयोग. घाईगडबडीने घेतलेले निर्णय चुकीचे ठरतील. सर्व तऱ्हेच्या

धोक्यापासून जपावे.

एप्रिल - प्रवास, भागीदारी, विवाह, नवे उद्योग, नोकरी-व्यवसाय या सर्वच बाबतीत ग्रहमान अनुकूल आहे. जर एखादा कारखाना घालण्याची आवड असेल, तर ते साध्य होईल. एखाद्या महत्त्वाच्या व्यवस्थापन समितीवर निवड होण्याची शक्यता. त्या दृष्टीने जरूर प्रयत्न करा, यश मिळेल.

मे - काही जणांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे असलेला नोकरी-व्यवसाय बंद करून दुसरे काही तरी करावेसे वाटेल. त्यामुळे काही जणांचा रोष पत्करावा लागेल. त्यासाठी कोणाचेही ऐकताना त्यांच्या अंतर कोपी हेतू काय आहे, हे ओळखून वागा. महिन्याच्या उत्तरार्धात अचानक धनलाभाचे योग.

जून - बुध-शुक्र सहकार्यामुळे आर्थिक स्थिती भक्कम राहील. विवाह कार्यातील अडचणी व गैरसमज दूर होतील. जे काम हाती घ्याल ते यशस्वी होईल. मानसिक समाधान देणाऱ्या घटना घडतील, पण कोणत्याही कामाचा अतिरिक्त अथवा बाऊ करू नका.

जुलै - रवि-शनिचा होणारा प्रतियोग मुलाबाळांच्या बाबतीत वैचारिक मतभेद निर्माण करील. नोकरीत असाल तर जपून राहावे लागेल. काही जणांचे राजकारण तुम्हाला नोकरी सोडण्यास भाग पाडील. मात्र, सावध राहिल्यास काहीही त्रास होणार नाही. कितीही गंभीर प्रसंग आला, तरी मन शांत ठेवून निर्णय घ्या. कुणाला जामीन राहू नका.

ऑगस्ट - मंगलकार्य, शुभकार्य, विवाह व संततीच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान. शनि-शुक्र प्रतियोग जीवनात आनंदी वातावरण निर्माण करील. महत्त्वाच्या कार्यात अनेकांचे सहकार्य लाभेल. एखादा मोठा व्यवसाय सुरू करणार असाल, तर या महिन्यात करू शकता.

सप्टेंबर - आपले कर्म चांगले असेल तर ‘भगवान देता है तो छप्पर फाडके’ या म्हणीनुसार हा महिना तुम्हाला उत्तम ठरणार आहे. एकाच वेळी अनेक ठिकाणांहून कामाच्या ऑर्डर मिळतील. विवाहासाठी अनेक स्थळांकडून होकार येईल. लक्ष्मीची कृपा राहील; पण घाईगडबड, गोंधळ न करता शांत मनाने

निर्णय घ्या.

ऑक्टोबर - धनस्थानात परस्परविरोधी ग्रहांचे वास्तव्य आहे. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. खर्च आणि कमाई यांचे गणित व्यवस्थित ठेवा. मशिनरी आणि वाहन वगैरे खरेदी करताना चौकस राहा. एखाद्या वेळेस टाकाऊ वस्तू रंगरंगोटी करून तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत कोर्ट प्रकरण करू नका.

नोव्हेंबर - अनावश्यक वस्तूंच्या खरेदीमुळे खर्चाचे प्रमाण वाढेल. चुकीच्या असल्याने काही आर्थिक अंदाज चुकतील. नेत्रविकार व मानेच्या विकारापासून जपा. अनावश्यक बडबड करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहा.

डिसेंबर - काही बाबतीत तडजोड करावी लागेल. दोन तुल्यबळ शत्रू आणि मित्र समोरासमोर उभे ठाकल्यावर काय परिस्थिती होईल, याची कल्पना करा. या महिन्यात अशा काही महत्त्वाच्या गोष्टी घडणार आहेत, की ज्या तुम्ही कल्पनाही केल्या नसतील. शुक्र-शनि यांचा योग एखाद्या गूढ शिक्षणात चांगले यश देईल. मंत्र, तंत्र, विद्या शिकण्यास अनुकूल. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात असणाऱ्यांना हा महिना उत्तम जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com