आयुष्याचा 'नजरीयाँ' बदलवणारे मिर्झा गालिब यांचे गुगल डूडल  

बुधवार, 27 डिसेंबर 2017

सतराव्या शतकातील कवी मिर्झा गालिब यांच्या आज 220 व्या जयंती निमित्त गुगलने डूडल समर्पित केले आहे. मुघल काळातील मिर्झा असदुल्ला बेग खान यांनी उर्दू, तुर्की आणि फारसी या भाषांमध्ये केलेले लिखाण आजही लोकांना भुरळ घालणारे आहे. ते नेहमी त्यांचे टोपणनाव गालिब आणि असद या नावांनीच प्रसिध्द होते. 

सतराव्या शतकातील कवी मिर्झा गालिब यांच्या आज 220 व्या जयंती निमित्त गुगलने डूडल समर्पित केले आहे. मुघल काळातील मिर्झा असदुल्ला बेग खान यांनी उर्दू, तुर्की आणि फारसी या भाषांमध्ये केलेले लिखाण आजही लोकांना भुरळ घालणारे आहे. ते नेहमी त्यांचे टोपणनाव गालिब आणि असद या नावांनीच प्रसिध्द होते. 

विशेषतः त्यांच्या उर्दू कविता आणि शायरीचे तेव्हा प्रमाणेच आताही चाहते आहेत. आयुष्याकडे बघण्याचा परिपूर्ण 'नजरीयाँ' (दृष्टीकोन) त्यांच्या कविता आणि शायरींमधून आपल्याला उमगतो. त्यांच्या काही उर्दू गझलही प्रसिध्द आहेत. 'आ की मेरी जान को करार नहीं है', 'आबरु क्या खाक उस गुल की की गुलशन में नहीं', 'आह को चाहिए एक उम्र असर होते तक', 'आईना क्यु न दु की तमाशा कहे जिसे' या गझलांनी संगीत चाहत्यांना वेड लावले. तर 'इश्क ने गालिब निकम्मा कर दिया, वर्ना हम भी आदमी थे काम के' अशा त्यांच्या शायरी चाहत्यांना 'दिवाना' करणाऱ्या आहेत.     

मिर्झा गालिब यांच्या जयांतीनिमित्त अभिनेता ओम भुतकरने 'ई सकाळ'शी हितगुज केले. 'मी गालिब' या नाटकात त्याने काम केले आहे. गालिब यांच्याबद्दल बोलताना तो म्हणाला, वसंत पोतदार यांचे मिर्झा गालिब यांच्यावरील पुस्तक वाचत होतो. तेव्हा गालिब यांचे शेर वाचून त्यांना अजून जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि मी त्यांना वाचायला लागलो. गालिबचे लिखाण सखोल असते. त्याच्या एकाच ओळीत अनेक अर्थ शक्यता दडलेली असते. जर तुम्हाला गालिबच्या साहित्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर दिवाण जे फारसी आणि उर्दु भाषेत उपलब्ध आहे आणि काही पत्रं गद्य स्वरुपात उपलब्ध आहेत. ज्यांचे वाचन करता येईल. पण गालिब वाचायला त्यांच्या कविता आणि शायरी समजून घ्यायला तेवढी तीव्र आवड असायला हवी.  नाटकाविषयी त्याने सांगितले, हे नाटक गालिब आणि एका लेखकाच्या आयुष्याचा संघर्ष कथन करणारे आहे.  

मिर्झा गालिब यांचा जन्म 27 डिसेंबर 1797 रोजी आग्रा येथे झाला. त्यांनी वयाच्या 11 व्या वर्षापासून कविता लिहिण्यास सुरुवात केली. वयाच्या 13 व्या गालिब यांचा विवाह झाला. त्या काळातील उच्चस्तरीय मुस्लिम प्रथा बघता ते दिल्लीत स्थायिक झाले. मिर्झा गालिब यांच्या कविता, शायरी, गझल यांमागे अशीही कल्पना आहे की आयुष्य हा एक सतत वेदनादायक संघर्ष आहे. जो केवळ जीवनचक्रासह समाप्त होतो. 

पद्य साहित्यात मानाचे स्थान असलेले गालिब यांनी जुनी दिल्ली येथे त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. मिर्झा गालिब यांचा मृत्यु 15 फेब्रुवारी 1869 मध्ये झाला. त्यांच्या मृत्यु पश्चात त्यांच्या घराला 'गालिब मेमोरिअल'मध्ये रुपांतरीत केले गेले. या मेमोरिअलला 'गालिब की हवेली' म्हणूनही ओलखले जाते. इथे कायम गालिब यांच्या संबंधातील प्रदर्शन सुरु असतात.   

Web Title: Marathi News Poet Shayari Gazals Mirza Galib 220 Birthday Google Tribute