#PuneRain पावसामुळे शहर अडकले वाहतूक कोंडीत 

trafiic jam in pune
trafiic jam in pune

पुणे : नदी पात्रातील रस्त्यावर आलेले पुराचे पाणी, पाऊस, रस्त्यांवरील जागोजागी पडलेले खड्डे, बंद पडलेले वाहतूक नियंत्रक दिवे आणि मार्गातच बंद पडलेल्या पीएमपी या सर्वांमुळे पुण्यातील उपनगरांसह शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तास-दीड तास प्रवास करूनही पुणेकर वेळेत आपल्या कामाच्या ठिकाणी पोचू शकले नसल्याचे दृष्य मंगळवारी सकाळी दिसत आहे. 

शहरात सोमवारी सकाळपासून पावसाचा जोड वाढला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून नऊ हजार 400 क्‍युसेक्‍सने मुठा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे. या पुरामुळे नदीपात्रातील रस्त्यावर पाणी आले आहे. त्याचा थेट परिणाम कोथरूड, वारजे, सिंहगड रस्ता येथून नदीमार्गे कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या पुणेकरांवर झाला. नदी पात्रातील रस्ता बंद झाल्याने सर्व वाहतूक कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, तसेच या दरम्यानच्या उपरस्त्यांवरून सुरू झाली. त्यातच वाहतूक नियंत्रण दिवे बंद झाल्याने रस्त्या-रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसर, महेंदळे गॅरेज परिसर, धोंडूमामा साठे होमिओपॅथिक महाविद्यालयापासून झालेली वाहतूक कोंडी डक्कनपर्यंत कायम होती. कर्वे रस्ता, घोले रस्ता, प्रभात रस्ता, कुमठेकर रस्ता या भागातही कोंडीतून मार्ग काढत वाहन चालक आपल्या कामाच्या ठिकाणी पोचण्यासाठी धडपड करत होते. शहरातील हे चित्र दुपारी दीड वाजेपर्यंत दिसत होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com