भारताच्या '4जी' प्रवासात जिओचा मोठा वाटा! - 'ओपन सिग्नल'

4G
4G

क्राऊडसोर्स वायरलेस कव्हरेज मॅपिंग करणाऱ्या 'ओपन सिग्नल' या संस्थेच्या अहवालाने भारत हा 2018 साली पूर्णपणे '4जी' नेटवर्कने व्यापलेला असेल व यात जिओचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असेल, असा अंदाज व्यक्त केला. सध्या '4जी'चा वापर सगळेच करताना दिसतात, हळू हळू हा वापर वाढत जाऊन सर्व भारत 2018 साली '4जी'मय होऊन जाईल असा दावा 'ऑपन सिग्नल'ने केला आहे.   

अलीकडच्या काळात जिओमुळे इंटरनेट व '4जी' नेटवर्क वापरण्यावर युजर्सचा जास्त भर आहे. विशेषतः रिलायन्स जिओ या 2018 ला भारत '4जी' होण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावेल. त्याचबरोबर या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, जिओ आपल्या सेवेच्या दरात 2018 साली नफ्याच्या दृष्टिने वाढ करेल. 

'ओपन सिग्नल'च्या अहवालानुसार -

'ओपन सिग्नल' संस्थेच्या वार्षिक अहवालात '4जी' नेटवर्कचा वापर व त्याची क्षमता याचा अभ्यास करून त्याबद्दल सविस्तर मत मांडले आहे. तसेच भविष्यातील '4जी'चा वापर कशाप्रकारे वाढत जाईल याबद्द्ल माहिती शेअर केली आहे. तसेच अहवालात म्हटले आहे की, '4जी'चा वापर दिवसेंदिवस वाढतच जाईल व इतर टेलिकॉम कंपन्यादेखील देशभर '4जी'चा विस्तार करण्यासाठी प्रयत्न करतील. या सर्व अभ्यासामुळे 'ओपन सिग्नल'चा असा दावा आहे की, भारत 2018 साली 100% '4जी' झाला असेल. 

या दाव्याला आधार म्हणून त्यांनी क्रिसिलच्या अहवालाचा संदर्भ दिला, ज्यानुसार भारतातील इंटरनेट वापर हा 2018 साली 80 टक्क्यांहून जास्त असेल. सध्या हा वापर 40% इतका आहे. 'TRAI'च्या अहवालानुसारही हेच दिसून येते की, भारतात '4जी'चा वापर वाढत चालला आहे व 2018 पर्यंत तो 100% झाला असेल. भारत हा टेलिकॉम बाजारपेठेत वाढ होणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे.   

जिओचा महत्त्वाचा वाटा, पण दरात वाढ होईल का?

'ओपन सिग्नल'च्या अहवालात जिओ नेटवर्क हे भारत 100% '4जी' करण्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय असेल असे म्हटले आहे. जिओने स्वस्त दरात '4जी' नेटवर्क देऊन इतर कंपन्यांना मागे टाकले. जिओच्या या यशस्वी पावलामुळे जीबी डेटाची किंमत ही 80% इतकी कमी झाली व '4जी' नेटवर्क हे अगदी सहजपणे सर्व लोक वापरू लागले. जिओने पहिल्यांदा सेवा मोफत दिली, त्यानंतर अनेक डिस्काऊंट देऊन त्यांनी ग्राहकांची मने जिंकली.     

जिओचे ग्राहक हे 91.6% एलटीई सिग्नल मिळवण्यात यशस्वी होतात, त्यामानाने इतर कंपन्या अजून ही सुविधा देण्यात मागे पडतात. पण अहवालात असे म्हणले आहे की, 2018 पर्यंत जिओ आणखी नवीन कल्पना व नेटवर्कची अधिक चांगली गुणवत्ता देण्यासाठी आपले दर वाढवतील.

अखेरीस या अहवालात असे सांगितले आहे की, 2018च्या शेवटापर्यंत संपूर्ण भारत देश हा '4जी' नेटवर्कने व्यापलेला असेल व यात सर्वात मोठी वाटा हा रिलायन्स जिओचा असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com