नरेंद्र मोदी बोगस ओबीसी - नाना पटोले

Marathi News Vidarbha News Nana Patole  blame on PM Narendra Modi
Marathi News Vidarbha News Nana Patole blame on PM Narendra Modi

गडचिरोली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोगस ओबीसी आहेत. त्यांनी जनतेला खोटी आश्वासनं देऊन सत्ता मिळवली आहे. असा थेट आरोप माजी खासदार नाना पटोले यांनी केला आहे. गडचिरोलीत आयोजित कुणबी समाजाच्या मेळाव्यात पटोले यांनी हा आरोप केला.

'गुजरातमध्ये मोदींनी 2001 पासून खुल्या गटातून विधानसभा निवडणूक लढवली. त्यानंतर त्यांनी तेली ही जात दाखवून लोकसभा निवडणूक लढवली. मोदी हे तेली, कुणबी आणि ओबीसीही नाहीत. त्यामुळे ते आपल्या शेतकऱ्यांचे दुःख कसे समजून घेतली. हे लक्षात आल्यानंतरच भाजपशी विद्रोह करुन मी खासदारकीचा राजीनामा दिला,' असे वक्तव्य पटोले यांनी केले आहे.

'स्वामिनाथन समितीची शिफारस लागू करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र अजूनही हे  आश्वासन पूर्ण केले नाही. एवढेच नव्हे तर लोकसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलू दिले जात नव्हते,' असेही आरोप नाना पटोले यांनी केले.   
  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com