β चिनी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार टाकूया...

पीटीआय
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

उरी हल्ल्यामुळे आणि त्यानंतर भारताने केलेल्या "सर्जिकल स्ट्राईक‘मुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमेवर गोळीबार करत असून, आपले जवान हुतात्मा होत आहेत. तर दहशतवादीही पुन्हा पुन्हा भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याची हिंमत करत आहेत. पाकिस्तानचा मित्र देश म्हणजे चीन. 

उरी हल्ल्यामुळे आणि त्यानंतर भारताने केलेल्या "सर्जिकल स्ट्राईक‘मुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करून सीमेवर गोळीबार करत असून, आपले जवान हुतात्मा होत आहेत. तर दहशतवादीही पुन्हा पुन्हा भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याची हिंमत करत आहेत. पाकिस्तानचा मित्र देश म्हणजे चीन. 

भारताविरुद्ध कारवाया करण्यासाठी चीन पाकिस्तानला सहकार्य करत असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. "शत्रूचा मित्र आपला शत्रू‘ या न्यायाने चीनही भारताचा अप्रत्यक्ष शत्रूच आहे. याशिवाय भारतामध्ये कोणतीही वस्तू आणि उत्पादने आली की हुबेहूब तशीच, अत्यल्प दरातील, बनावट उत्पादने भारतात उपलब्ध करून देत चीन भारतीय अर्थव्यवस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर सोशल मिडियावर सध्या चीनमधील भारतात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्व वस्तूंवर बंदी घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी नेटिझन्सनी मोहिमही उघडली आहे. चीनच्या वस्तूंवर आपण पूर्णपणे बहिष्कार टाकला, तर एकाअर्थी नाक दाबल्यास तोंड उघडू शकेल, अशी अवस्था पाकिस्तान आणि चीनची करता येईल. त्यामुळे सोशल मिडियावरील या मोहिमेत सहभागी होऊन चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकणे योग्य ठरणारे वाटते. 

दिवाळी सण सुरू होत असून विद्यार्थ्यांच्या सुट्या सुरू झाल्या आहेत किंवा होत आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी महानगरांसह, शहरे, उपनगरे आणि ग्रामीण भागातही ठिकठिकाणी फटाक्‍यांपासून शोभेच्या वस्तूंपर्यंत विविध प्रकारचे आकर्षक स्टॉल्स उभारलेले दिसत आहेत. त्यामध्ये भारतीय वस्तूंसह चीनी वस्तूंचाही समावेश आहे. एकाबाजूला ही परिस्थिती. तर दुसरीकडे भारत-पाकच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर दररोज गोळीबाराच्या घटना घडत आहेत. आपले सैनिक दहशतवाद्यांच्या आणि सीमेपलिकडून येणाऱ्या गोळ्या झेलत आहेत. भारतीयांचे संरक्षण करणारे आपले शूर जवान रात्रंदिवस पाकिस्तानी सैन्याला व दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. यामध्ये आपले काही जवान गोळीबारात जखमी होत असून, हुतात्माही होत आहेत. 

देश

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) औपचारिक सहभागी झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू)...

07.33 PM

नवी दिल्ली : दुकानाच्या दारात दारू प्यायला बसलेल्यांना हटकल्याने दारूड्यांनी केलेल्या चाकुहल्ल्यात नवी दिल्लीत एकाचा मृत्यू झाला...

02.27 PM

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) प्रवेशाचा ठराव संयुक्त जनता दल (जेडीयू) पक्षाने आज (शनिवार) संमत केला. पक्षाच्या...

02.09 PM