हे आवर्जून वाचा- "मास्तरांची सावली'

यूएनआय
बुधवार, 26 ऑक्टोबर 2016

कविवर्य नारायण सुर्वे आणि कृष्णाबाई सुर्वे यांचे जीवन एकमेकांसाठीच होते. दोघेही तसे अनाथच होते. लहानपणापासून असलेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि कृष्णाबाईंनी घरच्यांचा विरोध पत्करून नारायण यांचा हात धरला तो कधीही न सोडण्यासाठी. 

लग्नानंतरची नवलाई वाट्याला आली नाही तरी त्याबाबत खंत न बाळगता तो काळ त्यांनी घराच्या शोधात घालविला. कामगार चळवळीचे काम करणाऱ्या सुर्वे यांची ओळख जगाला नंतर कवी म्हणून झाली. त्यानंतर आयुष्य बदलले. या सर्व काळात मिळालेले अनुभव कृष्णाबाई सुर्वे यांनी "मास्तरांची सावली‘मधून कथन केले आहेत. कोणत्याही ऐहिक सुखाची अपेक्षा न धरता मास्तरांची सावली बनून वावरलेल्या कृष्णाबाईंचे हे आत्मकथन उत्कट आहे. पती-पत्नीच्या नात्याचा खरा अर्थ यातून उलगडतो. 

(हे पुस्तक BookGanga.com वर उपलब्ध आहे. मोफत घरपोच सेवा + 10 टक्के सूट यासाठी संपर्क क्र. 8600741110/751110/761110 *अटी लागू.)

Web Title: हे आवर्जून वाचा- "मास्तरांची सावली'

टॅग्स
फोटो गॅलरी