जम्मु काश्‍मीर: बस अपघातात 10 अमरनाथ यात्रेकरु मृत्युमुखी

वृत्तसंस्था
रविवार, 16 जुलै 2017

या अपघातामध्ये अन्य 35 जण जखमी झाले आहेत. अपघाताचे ठिकाण जम्मु-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर, बनिहालपासून जवळच आहे. या अपघाताचे कारण अद्यापी स्पष्ट झालेले नाही

नवी दिल्ली - जम्मु काश्‍मीर राज्यातील रामबन जिल्ह्यामध्ये आज (रविवार) एक बस अपघातग्रस्त झाल्याने किमान 10 नागरिक मृत्युमुखी पडले.

या बसमधून अमरनाथ येथे जाणारे यात्रेकरु प्रवास करत होते. या अपघातामध्ये अन्य 35 जण जखमी झाले आहेत. अपघाताचे ठिकाण जम्मु-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर, बनिहालपासून जवळच आहे. या अपघाताचे कारण अद्यापी स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

राज्यातील अनंतनाग जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी अमरनाथला जाणाऱ्या यात्रेकरुंच्या बसवर हल्ला करत आठ जणांचे प्राण घेतले होते. या पार्श्‍वभूमीवर, घडलेली ही अपघाताची घटना अत्यंत संवेदनशील मानली जात आहे. या प्रकरणी सविस्तर माहितीची अद्यापी प्रतीक्षा आहे