दहा नक्षलवाद्यांनी केले पोलिसांसमोर आत्मसमर्पण

वृत्तसंस्था
बुधवार, 26 एप्रिल 2017

लोहारडागा पोलिसांची ही नक्षलवाद्यांविरुद्धच्या मोहिमेअंतर्गतचे सर्वांत मोठे यश असल्याचे मानले जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी 22 एप्रिल रोजी माओवाद्यांच्या तावडीतून सहा जणांची सुटका केली होती. 

लोहारडागा (झारखंड) - लोहारडागा पोलिसांसमोर आज दहा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. यामध्ये दोन स्वयंघोषित प्रदेश कमांडरांचा समावेश असून, त्यांच्यावर दोन लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले होते, अशी माहिती आज पोलिसांनी दिली.

"बंदूक छोडो व्हॉलिबॉल खेलो', या अभियानांतर्गत नक्षलवाद्यांनी पोलिस उपमहानिरीक्षक ए. व्ही. होमकेर, उपायुक्त विनोदकुमार, पोलिस अधीक्षक कार्तिक एस. आणि अन्य पोलिसांसमोर त्यांनी आत्मसमर्पण केले, असे पोलिसांनी सांगितले. आत्मसमर्पण केलेल्या विशाल खेरवार आणि कैलाश खेरवार अशी प्रदेश कमांडरांची नावे असून, त्यांच्यावर दोन लाखांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले होते. 